चुकूनही दुसऱ्यांच्या या वस्तू वापरु नका...

प्रत्येक माणसाच्या आत एक विशिष्ट उर्जा असते. ज्याचा प्रभाव आजूबाजूच्या गोष्टींवरही होतो. अनेकदा दुसऱ्यांच्या वस्तूंचा प्रभावही आपल्या जीवनावर होतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या वस्तूचा वापर कधीही करु नये.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 29, 2017, 10:47 PM IST
चुकूनही दुसऱ्यांच्या या वस्तू वापरु नका... title=

मुंबई : प्रत्येक माणसाच्या आत एक विशिष्ट उर्जा असते. ज्याचा प्रभाव आजूबाजूच्या गोष्टींवरही होतो. अनेकदा दुसऱ्यांच्या वस्तूंचा प्रभावही आपल्या जीवनावर होतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या वस्तूचा वापर कधीही करु नये.

पेन - अनेकदा आपण एखाद्या कामासाठी दुसऱ्याचे पोन मागून घेतो मात्र बऱ्याचदा ते देण्यास विसरतो. मात्र हे अनेकदा आर्थिक समस्या आणि अपमानाचे कारण ठरु शकते. 

घड्याळ - मनगटी घड्याळ माणसाच्या जीवनावर सकारात्मक- नकारात्मक प्रभाव टाकत असते. यातच दुसऱ्याचे घड्याळ जर वापरत असाल तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर होतो. 

अंथरुण - वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्या व्यक्तीचे अंथरुण अथवा पलंगावर झोपणे अशुभ मानले जाते. 

रुमाल - एखाद्या व्यक्तीचा रुमाल मागून घेतल्याने त्या दोन व्यक्तींमध्ये भांडणाचे कारण ठरु शकते. तसेच आर्थिक समस्याही निर्माण होऊ शकते. 

कपडे - दुसऱ्यांचे कपडे कधीही चुकून वापरु नयेत. यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात समस्या येऊ शकतात.