Yukta Yog: मंगळ-सूर्याच्या युतीने बनला युक्त योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Yukta Yog: 17 नोव्हेंबर रोजी सूर्य देव गोचर केलं आहे. यावेळी सूर्य आणि मंगळ ग्रहाचा संयोग तयार झाला आहे. अनेक अर्थांनी नोव्हेंबर महिना अधिक लाभदायक ठरणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 17, 2023, 07:55 AM IST
Yukta Yog: मंगळ-सूर्याच्या युतीने बनला युक्त योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार title=

Yukta Yog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. ज्यावेळी एका राशीमध्ये दोन ग्रहांचा संयोग होतो, त्यावेळी खास राजयोग देखील तयार होतो. ज्योतिषात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर विशेष लक्ष दिले जाते. 

17 नोव्हेंबर रोजी सूर्य देव गोचर केलं आहे. यावेळी सूर्य आणि मंगळ ग्रहाचा संयोग तयार झाला आहे. अनेक अर्थांनी नोव्हेंबर महिना अधिक लाभदायक ठरणार आहे. अशाच वेळी सूर्य आणि मंगळ ग्रहाच्या स्थिती बदलामुळे युक्त योग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

कर्क रास

पाचव्या भावात सूर्य आणि मंगळ एकत्र राहतील आणि तुम्हाला लाभ देतील. अभिनय किंवा नृत्याशी संबंधित लोकांना मदत मिळेल. या राशीच्या व्यक्तींना पद, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख मिळेल. उत्पन्न वाढीसाठी हा काळ असेल. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळ शकणार आहे. 

सिंह रास

सूर्य आणि मंगळ तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात. तुम्ही चांगले उत्पन्न मिळवाल आणि बचत देखील करू शकाल. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांना चांगला नफा मिळू शकेल. नोकरी करणार्‍यांचे त्यांच्या करिअरमध्ये फायदे मिळविण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या इच्छाही पूर्ण होतील आणि तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

कोणतेही काम पूर्ण ताकदीने सुरू आणि पूर्ण कराल. या काळात तुम्हाला चांगले व्यक्तिमत्व सुधारणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. सुखसोयी मिळविण्याची तुमची इच्छा वाढणार आहे. गुंतवणुकीतूनही लाभ होण्याची चिन्हं आहेत. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप शुभ परिणाम मिळतील. या काळात तुम्ही देश-विदेशात फिरायला जाऊ शकता. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )