CSK vs KKR : चेपॉकच्या मैदानावर चेन्नईच किंग, कोलकाताने चाखली पहिल्या पराभवाची चव

CSK vs KKR Live Score, IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलचा 22 वा सामना चेन्नईच्या चिंदमबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

CSK vs KKR : चेपॉकच्या मैदानावर चेन्नईच किंग, कोलकाताने चाखली पहिल्या पराभवाची चव

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Score in Marathi : चेन्नईच्या चिंदमबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने असणार आहेत. कोलकाता संघ आतापर्यंतच्या आयपीएल 2024 सामन्यात अजेय आहे. कोलकाता नाईट रायडर्सने या 17 व्या हंगामात आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले असून या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईला गेल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चेन्नई पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करेल.

8 Apr 2024, 23:07 वाजता

न्नई सुपर किंग्सने केकेआरविरूद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने 67 धावांची कप्तानी खेळी खेळून सीएसकेला सोपा विजय मिळवुन दिला आहे. फलंदाजीत चेन्नईकडून मिचेलने 25, दुबेने 28 धावा करत केकेआरला एकतर्फी पराभूत केलं आहे. गोलंदाजीत केकेआरकडून निराशाजनक प्रदर्शन झाले, वैभव अरोरा याने 2 तर, सुनील नरेनने 1 विकेट घेतली आहे.

या विजयामुळे चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये मजबूत स्थितीत आली आहे, तर केकेआरला या सीझनमध्ये पहिला पराभव मिळाला आहे.

8 Apr 2024, 22:43 वाजता

15 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्स चा स्कोर 115-2 असा आहे. ऋतुराजने एक बाजू सांभाळून ठेवल्याने चेन्नई आता भक्कम स्थितीत आहे. शिवम दुबेसुद्धा चांगली फटकेबाजी करत आहे.

8 Apr 2024, 22:36 वाजता

सुनील नारायणच्या 13 व्या ओव्हरमध्ये सेट दिसत असणाऱ्या डॅरेल मिचेलला 25 धावांवर बाद केलं आहे. मिचेलच्या विकेटनंतर इन फॉर्म शिवम दुबे हा फलंदाजीसाठी आला आहे.

8 Apr 2024, 22:30 वाजता

12 व्या ओव्हरमध्ये सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं 45 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गायकवाडच्या या अर्धशतकात सात चौके सामील आहे.

8 Apr 2024, 22:15 वाजता

10 ओव्हरनंतर चेन्नईने या सामन्याचे पारडे आपल्या बाजूला केलं आहे. सीएसके 10 ओव्हरनंतर 81-1 अशा स्थितीत आहे. मिचेल आणि गायकवाड यांच्यात 54 धावांची भागीदारी झाली आहे.

8 Apr 2024, 21:54 वाजता

५ व्या ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 41-1 असा आहे. ऋतुराज गायकवाड हा 23 वर खेळत असून, डॅरेल मिचेल हा 1 वर खेळत आहे. या दोघं फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी होत असून, केकेआरला मॅचमध्ये परत येण्यासाठी विकेटची गरज आहे

8 Apr 2024, 21:50 वाजता

वैभव अरोराच्या चौथ्या ओव्हरमध्ये चेन्नईचा ओपनर रचिन रविंद्र 15 धावा बनवुन बाद झाला आहे. पहिल्या विकेटनंतर डॅरेल मिचेल हा फलंदाजीसाठी आला आहे.

8 Apr 2024, 21:18 वाजता

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नईसमोर जिंकण्यासाठी 138 धावांचे आव्हान आहे. केकेआरकडून आज साधारण फलंदाजीचे प्रदर्शन बघायला मिळाले, नरेनने 27, रघुवंशीने 24, तर श्रेयस अय्यरच्या 34 धावांच्या मदतीने कोलकाता 137 धावांपर्यंत पोहोचली आहे. चेन्नईच्या गोलंदाजांनी आज उत्तम प्रदर्शन करत केकेआरच्या घातक फलंदाजीला चूप ठेवले. जडेजा, तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 3, तर मुस्ताफिजूर आणि तीक्षणाने क्रमशः 2 आणि 1 विकेट घेतल्या आहेत.

तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, चेन्नईच्या या बॉलिंग पिचवर केकेआरच्या स्पिनरांची बॉलिंग चालणार, की चेन्नईचे फलंदाज या मॅचला आपल्या बाजूला खेचणार?

8 Apr 2024, 21:07 वाजता

19 व्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेने घातक दिसत असणाऱ्या आंद्रे रसलला 10 च्या स्कोरवर तंबूत परत पाठवलं आहे, याआधी मुस्ताफिजूरच्या गोलंदाजीवर धोनीने रसलचा सोपा कॅच सोडला होता.

8 Apr 2024, 20:55 वाजता

तुषार देशपांडेच्या 17 व्या ओव्हरमध्ये केकेआरला मोठा धक्का बसला आहे. रिंकू सिंग हा केवळ 9 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. आंद्रे रसल हा रिंकूच्या विकेटनंतर फलंदाजीसाठी आला आहे.