IPL 2024 RR VS DC Live Update : राजस्ठान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला दिली 12 धावांनी मात

IPL 2024 : आयपीएल 2024  च्या नवव्या सामन्यात आज संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहे.

IPL 2024 RR VS DC Live Update :  राजस्ठान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला दिली 12 धावांनी मात

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर हा सामना खेळवला जातोय. राजस्थान रॉयल्सने पहिला सामना जिंकत चांगली सुरुवात केलीय. तर दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. 

 

28 Mar 2024, 23:02 वाजता

यूजवेंद्र चहलच्या फिरकीचा जादू दिल्ली कॅपिटल्सत्या फलंदाजांवर होताना दिसतोय, 16 व्या ओव्हरीच चहलने इशान पोरेलला कॅच आऊट केले आहे.

28 Mar 2024, 22:57 वाजता

15 व्या ओव्हरच्या अखेरीस दिल्लीची स्ठिती पून्हा खराब झाली असून दिल्लीकडून आता ट्रिस्टन स्टब्स आणि इशान पोरेल मैदानावर उतरलेले आहेत, दिल्ली 15 व्या ओव्हरनंतर 120-4 या स्ठितीत आहे.

28 Mar 2024, 22:51 वाजता

युजवेंद्र चहलने 15 व्या ओव्हरमध्ये रिषभ पंतला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवून 28 धावांवर परत पाठवले आहे, दिल्लीचा स्कोर 14 वी ओव्हर संपताना 109-4 होता

28 Mar 2024, 22:38 वाजता

12 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला डेविड वॉर्नरच्या स्वरूपात मोठा धक्का लागलेला आहे. आवेश खानच्या गोलंदाजीवर संदीप शर्माने एक कमालीचा कॅच घेत वॉर्नर ला 49 वर परत पाठवले

28 Mar 2024, 22:31 वाजता

10 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्स स्ठिती रिशभ पंत आणि डेविड वॉर्नरच्या भागीदारीमूळे दिल्लीची इनिंग सावरलेली आहे आणि दिल्लीचा स्कोर 88-2 इतका आहे.

28 Mar 2024, 22:08 वाजता

पाच ओव्हरनंतर दिल्लीची स्ठिती थोडी गंभीर असून डेविड वॉर्नर आणि रिषभ पंतने दिल्लीच्या टीमला सांभाळलेले आहे आणि दिल्लीचा स्कोर 5 ओव्हरनंतर 47-2 इतका आहे.

28 Mar 2024, 21:58 वाजता

चौथ्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला दोन धक्के लागले आहेत, ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मिचेल मार्श आणि रिकी भूई दिल्लीच्या तंबूत परतलेले आहेत. दिल्लीला या कठिण परिस्ठीतीतून सावरण्यासाठी रिषभ पंत मैदानावर उतरलेला आहे

28 Mar 2024, 21:51 वाजता

IPL 2024 RR VS DC Live Update 
राजस्थान रॉयल्सने पराग रियानच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्ससमोर 186 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रियानने नाबाबत 84 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. याला उत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सने सावध सुरुवात केली आहे. सलामीलाला आलेल्या डेव्हिडि वॉर्नर आणि मिचेल मार्श जोडीने 2 षटकांनंतर 15 धावा केल्या आहेत. 

 

28 Mar 2024, 21:27 वाजता

20 ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्स 185 धावा करण्यात यशस्वी झाले आहेत. दिल्लीसमोर आता 186 धावा बनवण्याचे कडे आव्हान असणार आहे. राजस्थान रॉयल्सची सुरूवात जरी हळू होती पण नंतर आर आश्विन आणि रियान परागच्या तडाखेदार खेळींनी राजस्ठानला चांगल्या स्ठितीत आणून ठेवले आहे. राजस्ठानकडून रियान पराग याने 84, आर आश्विन याने 29, तर ध्रुव जूरेल आणि शेमरॉन हेटमायरने प्रत्येकी 20 आणि 14 धावांची मौल्यवान इनिंग्स खेळून दिल्लीच्या गोलंदाजांना दबावाखाली ठेवलं.

तसेच दिल्लीकडून प्रत्येक गोलंदाजाने एक विकेट आपल्या नावावर केली आहे. दिल्लीकडून मूकेश कुमार हा महागडा बॉलर ठरलेला आहे, त्याला राजस्ठानच्या फलंदाजांनी निशाण्यावर घेत 12.2 सरासरीने  4 ओव्हर्समध्ये एकूण 49 रन्स काढले, तर सर्वात किफायतीशीर गोलंदाज अक्षर पटेल ठरलेला आहे.

28 Mar 2024, 21:09 वाजता

18 व्या ओव्हरमध्ये नॉर्खियाने फक्त 7 धावा देत ध्रुव जूरेलची महत्वपूर्ण विकेट घेतली आणि या विकेटमुळे शेमरॉन हेटमायर मैदानात उतरलेला आहे.