KKR vs DC highlights, IPL 2024 : इडन गार्डनवर कोलकाताची 'बादशाहत', दिल्लीचा 7 विकेट्सने पराभव

KKR vs DC Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात आज कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.   

KKR vs DC highlights, IPL 2024 : इडन गार्डनवर कोलकाताची 'बादशाहत', दिल्लीचा 7 विकेट्सने पराभव

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता आणि दिल्ली हे दोघं संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. पहिल्यांदा जेव्हा हे दोघं संघ भिडले होते, तेव्हा केकेआरने, दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल 106 धावांनी धुव्वा उडवला होता. तर आता बघण्यायोग्य असणार की, आज ऋषभ पंतची दिल्ली आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का?

29 Apr 2024, 20:24 वाजता

10 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर आहे 93-4. अक्षर पटेल आणि ऋषभ पंत हे दोघं फलंदाजी करत आहेत. अक्षर हा 12 धावांवर खेळतोय, तर पंत हा 27 धावांवर नाबाद आहे.

29 Apr 2024, 20:13 वाजता

 7 व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने दिल्लीचा युवा फलंदाज अभिषेक पोरेल याला 18 धावांवर आउट केलं आहे. चौथ्या विकेटनंतर मैदानात फलंदाजीसाठी अक्षर पटेल आलाय.

29 Apr 2024, 19:59 वाजता

5 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर 58-3 असा आहे. पोरेल हा 17 धावांवर तर, पंत हा 5 धावांवर खेळत आहे. कोलकाताच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीचे फलंदाज बॅकफूटवर गेले आहेत.

29 Apr 2024, 19:57 वाजता

चौथ्या ओव्हरमध्ये वैबव अरोराने परत एक विकेट घेतली आहे. दिल्लीचा ताबडतोब फलंदाज शे होप हा फक्त 6 धावा करून आउट झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर फलंजादीसाठी ऋषभ पंत आला आहे.

29 Apr 2024, 19:56 वाजता

तिसऱ्या ओव्हरमध्ये दिल्लीचा इन फॉर्म फलंदाज फ्रेजर मॅक्गर्क हा 12 धावा करून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर शे होप हा फलंदाजीसाठी आलाय.

29 Apr 2024, 19:42 वाजता

वैभव अरोराच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये दिल्लीचा घातक फलंदाज पृथ्वी शॉ हा केवळ 13 धावा करून आउट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर अभिषक पोरेल हा फलंदाजीसाठी आलाय.

29 Apr 2024, 19:05 वाजता

KKR vs DC toss update - दिल्ली कॅपिटल्सचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

KKR प्लेइंग 11 - 

फिलिप सॉल्ट (W), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

DC प्लेइंग 11 -

पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (W/C), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद

29 Apr 2024, 17:11 वाजता

KKR vs DC संभाव्य प्लेइंग 11 -

KKR संभाव्य 11 -

श्रेयस अय्यर (C), फिल सॉल्ट (W), सुनील नरेन, नीतिश राणा (उपकप्तान), वेंकटेश अय्यर, मिशेल स्टार्क, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अंगकृष रघुवंशी, सुयश शर्मा

DC संभाव्य 11 -

ऋषभ पंत (C/W), पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, मिशेल मार्श, अक्षर पटेल, कुमार कुशाग्र,ललित यादव, ईशांत शर्मा, जेक फ्रेजर-मैकगर्क, कुलदीप यादव और खलील अहमद.

29 Apr 2024, 17:08 वाजता

आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि कोलकाता एकूण 33 आमने-सामने आले आहेत. त्यातून 15 सामने दिल्लीने जिंकले आहेत तर, कोलकाताने एकूण 17 सामन्यात आपलं वर्चस्व दाखवले आहेत, आणि एका सामन्यात कोणत्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, दिल्ली केकेआरला हरवुन आपला 16 विजय निश्चीत करणार का?