MI vs PBKS : मुंबईने सामना जिंकला पण आशुतोषने जिंकलं काळीज, पलटणचा 9 धावांनी विजय

PBKS vs MI Live Score, IPL 2024 :  आज आयपीएल 2024 चा 33वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

MI vs PBKS : मुंबईने सामना जिंकला पण आशुतोषने जिंकलं काळीज, पलटणचा 9 धावांनी विजय

Punjab Kings vs Mumbai Indians  Live Score in Marathi : मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. आत्तापर्यंत दोन्ही संघांचे सहा सामने दोन विजय आणि चार पराभवांसह समान गुण आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघांना आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे.

18 Apr 2024, 20:31 वाजता

मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर रोहित शर्मा 36 धावांवर बाद झाला. सॅम करनच्या गोलंदाजीवर हरप्रीत ब्रारने रोहित शर्माचा सुंदर झेल टिपला. सुर्यकुमार यादव आणि रोहित शर्माने दमदार फटकेबाजी करत मुंबईला धावांचा टप्पा गाठून दिला होता.

18 Apr 2024, 20:02 वाजता

मुंबई इंडियन्सने 50 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ईशान किशन बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवने रोहित शर्माच्या मदतीने फटकेबाजी केली. सहाव्या षटकातच मुंबईला पन्नास धावांचा टप्पा गाठून दिला. यात रोहितने 25  तर सूर्यकुमारच्या 22 धावांचा वाटा होता.

18 Apr 2024, 19:41 वाजता

MI vs PBKS LIve Update

आयपीएलच्या तेहतीसाव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमने सामने आहेत. पंजाबने टॉस जिंकन पहिली गोलंदाजी घेतली. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि ईशान किशनने डावाची सुरुवात केली. रोहित आणि ईशानने पहिल्या दोन षटकातच आक्रमक फलंदाजी करत 18 धावा केल्या. पण तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ईशान 8 धावा करुन बाद झाला. रबाडाने त्याची विकेट घेतली.

18 Apr 2024, 19:12 वाजता

पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शिखर धवनही या सामन्यात उपलब्ध नसेल. त्याचबरोबर आजच्या सामन्यात जॉनी बेअरस्टो देखील खेळताना दिसणार नाही. त्यांच्या जागी रिले रुसोला संधी मिळाली आहे. 

18 Apr 2024, 19:11 वाजता

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (क), जितेश शर्मा (WK), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (WK), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

18 Apr 2024, 19:09 वाजता

हेड टू हेड रेकॉर्ड

महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या मोसमात आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये दोनदा संघांनी लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला, तर एकदा सनरायझर्स हैदराबादने धावसंख्येचा बचाव करून सामना जिंकला. एसआरएचने केवळ 2 धावांनी हा विजय नोंदवला. या जमिनीवर दव चा फारसा परिणाम होत नाही. मात्र, मागील सामन्यातील विक्रम लक्षात घेता येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घ्यायचा आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आहे.