SRH vs RCB highlights, IPL 2024 : बंगळुरूचा हैदराबादमध्ये रॉयल विजय, सनरायझर्सवर 35 धावांनी मात

SRH vs RCB Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 41 व्या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आज तगड्या सनरायझर्स हैदाराबादसमोर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengluru) आव्हान असणार आहे.  

SRH vs RCB highlights, IPL 2024 : बंगळुरूचा हैदराबादमध्ये रॉयल विजय, सनरायझर्सवर 35 धावांनी मात

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Live Score in Marathi : सनरायझर्स हैदराबादचा संघ यावर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2024 मध्ये बाकी संघांसाठी SRH ची टीम ही डोकेदुखी बनली आहे. तर दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गाडी अजूनपर्यंत रूळावर आलेली नाही. अशातच बघण्यायोग्य गोष्ट असणार की या मॅचमध्ये ही हैदराबाद आपल्या फलंदाजीचे वर्चस्व दाखवणार किंवा बंगळुरू या सामन्यात आपलं दमदार कमबॅक करणार? आयपीएल 2024 च्या पॉइंट्स टेबलमध्ये हैदराबादचा संघ हा 10 पॉइंट्स सोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि बंगळुरूचा संघ फक्त 2 पॉइंट्ससोबत शेवटच्या म्हणजेच 10 व्या स्थानावर आहे.

 

25 Apr 2024, 22:41 वाजता

15 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोर आहे मैदानावर भूवनेश्वर आणि शाहबाज हे दोघं फलंदाजी करत आहेत. या स्थितीतून हैदराबादला 34 बॉलमध्ये 84 रन लागत आहे.

25 Apr 2024, 22:36 वाजता

14 व्या ओव्हरमध्ये क्रिस ग्रीनच्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करत असलेला पॅट कमिंस हा 31 धावा करून बाद झाला आहे. आता भूवनेश्वर फलंदाजी करण्यासाठी आलाय.

25 Apr 2024, 22:21 वाजता

10 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोर 89-6 असा आहे. कमिंस आणि शहबाज हे दोघं फलंदाजी करत आहे. हैदराबादला या स्थितीतून जिंकण्यासाठी 60 बॉलमध्ये 118 रन लागत आहे.

25 Apr 2024, 22:19 वाजता

कर्ण शर्माने 10 व्या ओव्हरमध्ये अब्दूल समदला 10 धावांवर बाद केलं आहे आणि याच विकेट सोबत हैदराबादच्या जिंकण्याच्या आशा अजून कमी झाल्या आहेत. सहाव्या विकेटनंतर पॅट कमिन्स हा फलंदाजीसाठी आलाय.

25 Apr 2024, 22:08 वाजता

8 व्या ओव्हरमध्ये कर्ण शर्माने नितीश रेड्डीला 13 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. पाचव्या विकेटनंतर अब्दूल समद हा फलंदाजीसाठी आला आहे.

25 Apr 2024, 21:55 वाजता

सनरायझर्स हैदराबादची स्थिती चौथ्या विकेटनंतर थोडी वाईट झाली आहे. स्वप्निल सिंगने मारक्रमला बाद केल्यानंतर लगेच क्लासेनला पण आउट केलं आहे. तर चौथ्या विकेटनंतर शहबाज अहमद हा फलंदाजीसाठी आला आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर हैदराबादचा स्कोर 58-4 असा आहे.

25 Apr 2024, 21:50 वाजता

स्वप्निल सिंग याने पाचव्या ओव्हरमध्ये एडन मारक्रमला फक्त 7 धावांवर आउट केलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर फलंदाजीसाठी आणखी एक धाकड फलंदाज हेनरिच क्लासेन हा आलाय.

25 Apr 2024, 21:43 वाजता

सनरायझर्स हैदराबादचे दोघं ओपनर्स आता तंबूत परतले आहेत, यश दयालच्या चौथ्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा हा 31 धावांवर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर आशिष रेड्डी हा फलंदाजीसाठी आलाय.

25 Apr 2024, 21:31 वाजता

विल जॅक्सच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हैदराबादचा धाकड फलंदाज ट्रॅविस हेड हा शून्यावर आउट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर एडन मारक्रम हा फलंदाजीसाठी आलाय.

25 Apr 2024, 21:11 वाजता

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर रॉयल चलंजर्स बंगळुरूने 206 धावा केल्या आहेत, तर सनरायझर्स हैदराबादसमोर 207 धावांचे आव्हान दिलं आहे. बंगळुरूकडून सर्वात जास्त रजत पाटीदारने 56 तर, विराट कोहलीने 51 धावा केल्या आहेत, तर शेवटच्या ओव्हरमध्ये कॅमरन ग्रीन याने फटकेबाजी करून 37 धावा केल्या आहेत. तर हैदराबादकडून उनाडकटने 3 विकेट घेतल्या आहेत, नटराजनने 2, तर मार्कंडे आणि कमिन्स यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.

आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, हैदराबादच्या दमदार फलंदाजीसमोर बंगळुरूची कमकुवत गोलंदाजी टिकणार की नाही?