राजू शेट्टींना जामीन मंजूर पण...

ऊसदर आंदोलनप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांना बारामती जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांनी जामीन देण्यात आलाय. पण, यावेळी न्यायालयानं शेट्टी यांनी तीन तालुक्यात प्रवेश बंदीही केलीय.

ऊस आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन काही थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांमध्ये आज निषेध मोर्चा आणि बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली.

`स्वाभिमानी`नं रोखल्या शिवसैनिकांच्या गाड्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दरवाढीसाठी सुरू केलेलं आंदोलनही अजून थंड झालेलं नाही. या आंदोलनाचा फटका शिवसैनिकांना बसू नये, यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आवाहन केलंय.

आंदोलनकर्त्यांवर पुन्हा गोळीबार; एक जखमी

सांगली जिल्ह्यातील आष्टा गावात ऊस दरासाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रवीण पाटील हा तरुण जखमी झालाय.

मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठं, असा प्रश्न विचारला जातोय. ज्या शेतक-यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वा-यावर सोडल्याचं चित्र दिसून येतंय.

राज ठाकरेही उसाच्या फडात

आमदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदरवाढ आंदोलनाला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माम सेनेनेही पाठिंबा दिला आहे. यासाठी मनसेच्या आमदारांचे शिष्टमंडळ पाठिंब्यासाठी बारामतीला रवाना झाले आहे.