दागिने

महागड्या आभुषणांनी सजतायत गणपती बाप्पा!

गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे गणेश मंडळांची तयारी वेगाने सुरू आहे. बाप्पासाठी दागिन्यांचे सध्या विविध ट्रेंड बाजारात  पाहायला मिळत आहेत.  

Sep 11, 2015, 08:25 PM IST

लालबागच्या राजाचं दर्शन सर्वात प्रथम!

लालबागच्या राजाचं दर्शन सर्वात प्रथम!

Sep 11, 2015, 06:57 PM IST

सोन्याचे दर घसरले... जाणून घ्या ग्राहकांनी काय करावं?

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. सोन्याला मागणी कमी झाल्यामुळं मागच्या दोन वर्षातील ही सगळ्यात मोठी घसरण आहे.

Jul 23, 2015, 04:31 PM IST

महिलेच्या डोक्यात दगड घालून दागिने लंपास

शॉर्टकट पद्धतीनं पैसे कमावण्याच्या मागं लागल्यानं दिवसेंदिवस चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होतेय. अशीच एक घटना हडपसर या ठिकाणी घडली आहे. हडपसर इथल्या टकलेनगर इथं शेतात महिलेच्या डोक्यात दगड घालून तिच्या अंगावरील सहा तोळ्याचे दागिने लपास केले आहे. ही घटना बुधवारी हडपसरमध्ये घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Dec 13, 2013, 08:23 PM IST

मी ऑनलाईन खरेदीसाठी लालची आहे - करीना कपूर

`मैं अपनी फेव्हरेट हूँ...` म्हणणाऱ्या करीनानं आता स्वत:बद्दल आणखी एक रहस्य उघड केलंय. घरात आरामात बसलेली असताना मी ऑनलाईन खरेदी करते, तेव्हा गरजेपेक्षा जास्तच वस्तूंची खरेदी माझ्याकडून होते, असं करीनानं म्हटलंय.

Oct 22, 2013, 04:02 PM IST

सोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क १०वरून १५% वर!

सोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क सरकारनं दहा टक्यांन वरून पंधरा टक्यां वर नेलंय. या दागिन्यांची आयात रोखण्यासाठी आणि देशातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी आता सोन्याच्या दागिन्यांचे दर वाढणार आहेत.

Sep 18, 2013, 09:19 AM IST

सोन्यानं गाठली बत्तीशी!

एकीकडे शेअर बाजार आणि रुपयाला उतरती कळा लागलीय. तर दुसरीकडे सोन्यानं मात्र बत्तीशी गाठलीय. सोन्यानं रेकॉर्ड करत ३२ हजार ५२६ एवढा भाव खाल्लाय.

Aug 27, 2013, 01:11 PM IST

पारंपरिक दागिन्यांची सर कशालाच नाही!

‘चपलाहार, मोहनमाळ, चंद्रहार आणि नाकातील चापाची नथ हे माझे आवडते दागिने... पण खरं सांगू का, माझ्या सासूबाईंनी मला दिलेल्या पाटल्यांची सर कशालाच नाही हं!’... धक धक गर्ल माधुरी नेन्यांचं कौतुक करत होती.

Aug 5, 2013, 12:00 PM IST

पोलीस असल्याचे भासवून दागिन्यांची चोरी

पोलीस असल्याचे सांगून सांगलीतल्या सराफी दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. चिंतामणनगरमधील अक्षरा ज्वेलर्समधून पोलीस असल्याचे सांगून चोरट्यांनी सात तोळ्याचे दागिने लंपास केले. मात्र एका ठिकाणी चोरी केल्यानंतर दुस-या दुकानात चोरट्यांचा डाव फसला.

Jul 15, 2012, 07:27 AM IST

सराफाच्या दुकानात वॉचमननेच केली चोरी

मुंबईतल्या झवेरी बाजारातील एका सराफ दुकानातून तब्बल ५० लाखांचे दागिने चोरण्यात आलेत. ही चोरी सराईत चोरांनी केली नव्हती, तर त्या दुकानाची रखवालदारी कऱण्याची ज्याच्यावर जबाबदारी तोच रखवालदार चोर निघाला.

Dec 20, 2011, 01:31 PM IST

मिनीषा लांबा हिला ४ लाखांचा दंड

अभिनेत्री मिनीषा लांबा हिला ४ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. १८ मेला कान्स फिल्म फेस्टीव्हलहून परततांना जवळपास ३३ लाखांचे दागिने आणि काही अमुल्य वस्तू कस्टम ड्यूटी न भरता ग्रीन चॅनेलमधून नेल्याप्रकरणी तिला हा दंड भरावा लागणार आहे.

Dec 17, 2011, 11:43 AM IST

घाटकोपरमध्ये भिंत आणि छप्पर फोडून चोरी

घाटकोपर भागात भिंत आणि छप्पर फोडून चोरी करणाऱ्या टोळीने खळबळ उडवून दिली आहे. केवळ २४ तासांत चार ठिकाणी डल्ला मारण्यात आलाय.विशेष म्हणजे एकाच परिसरातल्या चार दुकानांना लक्ष्य कऱण्यात आलंय.

Nov 29, 2011, 02:09 PM IST