demanding bribe

लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यानेच लाच मागितली...आणि

सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं लाच मागितली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीकडे तक्रार करता येते. 

Dec 26, 2019, 12:45 PM IST

लाच मागणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला जामीन मंजूर

सॉफ्टवेअर मध्ये डाटा इंट्रीचे प्रलंबित बिल अदा करण्यासाठी एकूण रकमेच्या १५ टक्के रक्कम म्हणजेच 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल अटक केली होती. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना ३ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी काल अँटी करप्शन ब्युरोनं अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी विशेष न्यायालयानं इतवारे यांना जामीन मंजूर केला.

May 6, 2017, 10:53 AM IST

आयएएएस अधिका-याला लाच घेतांना अटक

आश्रम शाळेतील भ्रष्टाचाराचा आणखीन एक पाढा समोर आलाय. आदिवासी विभाग अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे ( IAS ) आणि उपआयुक्त किरन माळी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने  १२ लाखांची लाच घेतांना शहापूर येथे रंगेहात अटक केली आहे.

Apr 16, 2017, 09:11 AM IST