मच्छिमार आंदोलन नितेश राणेंची स्टंटबाजी : तांडेल

मच्छिमार आंदोलन नितेश राणेंची स्टंटबाजी : तांडेल

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पारंपरिक मच्छिमारांसाठी केलेले आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलीय. 

मुंबईतल्या शिवरायांच्या सागरीस्मारकावरून वादंग

मुंबईतल्या शिवरायांच्या सागरीस्मारकावरून वादंग

अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. एकीकडं पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजनाची जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे मच्छिमारांनी त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरीत मासेमारी नौका बुडाली, 8 जणांना वाचविण्यात यश

रत्नागिरीत मासेमारी नौका बुडाली, 8 जणांना वाचविण्यात यश

मिरकरवाडा येथे मासेमारी नौका उलटली आणि बुडाली. मात्र, 8 जणांना वाचविण्यात यश आले आहे.

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यात स्थानिक मच्छिमारांची मोठी मदत

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यात स्थानिक मच्छिमारांची मोठी मदत

महाड पूल दुर्घटनेत आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडलेत त्यातील बहुतांश मृतदेह हे तिथल्या स्थानिक मच्छिमरांनी काढले आहेत.

'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'

'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'

मुंबईतल्या अवैध पर्ससीन बोटीच्या मालकांकडून दर महिन्याला एकनाथ खडसेंना पाच कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता. खडसेंना तब्बल ३० कोटींचा हप्ता मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समीतीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय. 

रमजानच्या मुहूर्तावर 'सद्भावना' : मच्छिमार कैद्यांची होणार सुटका

रमजानच्या मुहूर्तावर 'सद्भावना' : मच्छिमार कैद्यांची होणार सुटका

पाकिस्ताननं आज मालिर तुरुंगात बंद असलेल्या 113 भारतीय मच्छिमारांची सुटका केलीय. 

श्रीलंकेकडून भारतीय मच्छीमारांना अटक...

भारताची सागरी सीमा पार केल्याने श्रीलंकेच्या नौदलाकडून २२ भारतीय मच्छीमारांना आज अटक करण्यात आली. हे सर्व मच्छीमार तमिळनाडूतील पुडुकोट्टी जिल्ह्यातील जगडापट्टीनम या गावातील आहेत.

नेव्हीच्या जहाजाची बोटीला धडक

नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

फायलीन चक्रीवादळ : विमानसेवेवर परिणाम, मच्छिमारांना इशारा

फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

कोळ्यांची मासेमारी, `बाप्पां`ची सागरवारी!

कोळी बांधव आपल्या बोटीवरच गणेशोत्सव साजरा करतात. आणि मग या मच्छिमारांबरोबरच बाप्प्पाचा समुद्र प्रवास सुरु होतो.

कोळ्यांचे सात किलो दागिने घेऊन सोनाराचा पोबारा

मुंबईतील माहुल कोळीवाड्यातील कोळी बांधवांची एका बंगाली सोनाराने जबरदस्त फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ऐन नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.

सण आयलाय गो...नारळी पूनवेचा!

सण आयलाय गो नारळी पूनवेचा... असं म्हणत कोकणात सध्या नारळी पौर्णिमेची लगबग सुरु आहे. नारळी पौर्णिमेला नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात होते.

सलमान करतोय मुंबईच्या `भूमिपुत्रांना` बेघर!

सलमान खानची ‘बॅड बॉय’ इमेज पुन्हा एकदा पुढे आली आहे. सलमान खानवर आणि त्याच्या सुरक्षारक्षकांवर मच्छीमारांना धमकावण्याचा, मारहाण केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच सलमान खानने मच्छीमारांच्या बोटींचं नुकसान केल्याचा आरोपही त्याच्यावर होत आहे.

पवना जलाशयात ४०-५० कासवांचा मृत्यू

पुण्यात पवना धरण जलाशयामध्ये तब्बल 40 ते 50 कासवांचा एकाच वेळी मृत्यू झालाय. ही घटना घडूनही संबंधित खात्याचा एकही अधिकारी चार दिवस घटनास्थळी फिरकला नाही.

केरळ गोळीबारात दोन मच्छीमार ठार

केरळच्या समुद्रात काल रात्री इटलीच्या एन्रिको लेक्सी या जहाजावरील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात, दोन भारतीय मच्छीमार ठार झाले आहेत.

दर्याच्या राजाला मिळणार दिलासा

आता राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांच्या तसंच वहिवाटीच्या जमिनी आता लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत.

भारतीय मच्छीमारांवर हल्ला

श्रीलंकेच्या नौसेनेने समुद्रात मासेमारी करत असलेल्या भारतीय मच्छीमारांवर आज हल्ला चढवला.