ipl 2023 live

IPL 2023: आयपीएलची रंगत वाढवणाऱ्या चिअरलीडर्सना किती मानधन मिळतं?

IPL 2023 Cheer Leaders Salary: अशा या स्पर्धेतील आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे तिथं असणाऱ्या चीअरलीडर्स. एखादा विकेट जावो, फलंदाजानं चौकार- षटकारांची बरसात करो, किंवा शकतं आणि आणि अर्धशतकं झळको, या चीअरलीडर्स लगेच तिथं असणाऱ्या व्यासपीठावर येऊन कमाल नृत्य सादर करतात आणि उपस्थितांचं लक्ष वेधतात. 

 

Mar 30, 2023, 09:58 AM IST

IPL 2023 मध्ये कर्णधार म्हणून धोणीच 'बॉस', तब्बल 'इतक्या' सामन्यात केलंय नेतृत्व

IPL 2023 Photos : आयपीएलचा  हा सोळावा हंगाम आहे. गेल्या सोळा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. धोणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने तब्बल पाचवेळा ट्ऱ़ॉफीवर नाव कोरलं आहे. आणि या हंगामातही मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरणार आहे. आपण पाहुया सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांची यादी

Mar 29, 2023, 02:10 PM IST