koyna dam full

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन

कोयना धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 2 वाजेपासून 10 हजार 264 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू होता. त्यानंतर 5 वाजेपासून 25 हजार क्युसेस इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Sep 12, 2021, 06:49 PM IST