maha state

राज्यातही अनेक विजय माल्ल्या : अर्थमंत्री

राज्यातही अनेक विजय माल्ल्या असल्याचं स्पष्ट झालंय. शासनाचा २९०० कोटींचा विक्रीकर बुडवून व्यापारी बेपत्ता झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.

Dec 21, 2017, 04:17 PM IST

भीषण पाणीटंचाईमुळे राज्यावर मोठे वीज संकट

  चंद्रपूर महापालिकेने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे काही संच बंद करण्याची विनंती केलीय. तसं झाल्यास राज्यात मोठं वीज संकट उद्धभवणार आहे.

Aug 24, 2017, 11:51 PM IST

‘त्या’ ७३० कृषी सेवकांना रूजू करून घ्या, मॅटचा महत्वपूर्ण निर्णय

कृषीसेवक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या ७३० कृषी सेवकांना कृषी विभागात रूजू होता येणार आहे. कारण मॅटने म्हणजेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने राज्य सरकारचा कृषीसेवक भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरूवारी रद्द केला आहे.

Aug 10, 2017, 11:30 PM IST

ऊस लागवडीसाठी राज्यात ठिबक सिंचन बंधनकारक

ऊस लागवडीसाठी राज्यात ठिबक सिंचन बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. 

Jul 18, 2017, 05:43 PM IST

मोठ्या विश्रातीनंतर पावसाचे पुनरागम, राज्यात चांगला पाऊस

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री मुंबई, ठाणे, कोकण आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.

Jul 14, 2017, 09:01 AM IST

राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना

जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी येथे राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत  ग्रामरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. 

Jun 8, 2017, 02:49 PM IST

राज्यात २४ तासात पाऊस बरसणार

मान्सून केरळात दाखल झालाय. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसत आहे. पुढील २४ तासात राज्यात पावसाला चांगली सुरुवात होईल, अशी  शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Jun 2, 2017, 06:20 PM IST

राज्यात दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भ तापलाय

येत्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात मात्र पारा 46.2 अंशावर आहे.

May 16, 2017, 08:26 AM IST

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता

राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Apr 29, 2017, 04:36 PM IST

राज्यात २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

  मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Feb 9, 2017, 10:55 PM IST

राज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे

राज्याच्या विविध भागात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे मारलेत. यांत नाशिक शहरातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे.

Jan 19, 2017, 08:01 AM IST

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या स्मृतीदिनी विविध कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराजांना चारित्र्य, चातुर्य, संघटन कौशल्य अशा राजस सत्वगुणांची शिकवण देणा-या राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा आज स्मृतीदिन साजरा करण्यात आला.

Jan 12, 2017, 10:15 PM IST

वरदाह चक्रीवादळाचा फटका राज्यातील शेतीला, अचानक पावसाची हजेरी

वरदाह वादळं शमले असले त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. कोकण आणि मराठवाड्यात अचानक पावसाने हजेरी लावलीय. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला असून रब्बीच्या पिकावर कीड आणि रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

Dec 14, 2016, 09:40 PM IST

अजितदादा गप्प! सुप्रिया सुळे राज्यात अचानक सक्रीय, अनेकांच्या भुवया उंचावल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात अचानक सक्रीय आणि आक्रमक झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

Oct 8, 2016, 06:15 PM IST