raj

राज ठाकरे उद्या मांडणार आपली भूमिका, उमेदवारांची यादी होणार घोषित?

राज ठाकरे उद्या मांडणार आपली भूमिका, उमेदवारांची यादी होणार घोषित?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार आहेत. सध्या मनसेची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहेत. अनेक विद्यमान नगरसेवक दुसऱ्या पक्षात जात आहेत. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले तरी मनसेत शांतता आहे. त्यातच शिवसेनेचा भाजपसोबतचा काडीमोड झाल्याने मनसेने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शिवसेनेने त्यांच्या प्रस्तावावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच राज यांना वेटिंगवरच ठेवले.

Jan 31, 2017, 05:54 PM IST
वेगळ्या विदर्भाला माझा विरोध - राज ठाकरे

वेगळ्या विदर्भाला माझा विरोध - राज ठाकरे

वेगळ्या विदर्भाला माझा विरोध आहे, विदर्भाचा विकास ज्यांनी केला नाही, त्याचा राज्याला त्रास का, यासाठी राज्याचे तुकडे पाडणे हा उपाय असू शकत नाही, ज्यांनी विकास केला नाही, त्याची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला कशी देणार, असं राज यांनी म्हटलंय.

Aug 24, 2014, 07:24 PM IST

आर.आर. पाटीलांची 100 मीटर तरी पावलं धावतील का ?- राज

आर.आर.पाटील 100 मीटर तरी पावलं धावतील का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या राजगर्जना या पुस्तकाचे प्रकाशन राज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पोलीस भरतीचा विषय राज यांनी उचलून धरला होता.

Jun 16, 2014, 04:12 PM IST

मनसेचा बालेकिल्ला ढासणार हे समजताच राज नाशिक दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जादू चालणार नाही, हे सर्वच एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी नाशिक येथे ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतंय.

May 14, 2014, 05:07 PM IST

राजकीय हिशेब...व्हीआयपी सुरक्षेचं गौडबंगाल

राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं वाढ केली आहे. याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे. यामागे काही राजकीय हिशेब आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Oct 11, 2013, 10:31 AM IST

राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

Oct 9, 2013, 12:53 PM IST

बाळासाहेबांनी सूपही घेतलं, फळंही मागितली आहेत- राज ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठिक आहेत. त्यांनी नुकतचं आता सूप घेतलं आहे, आता त्यांनी फळंही मागितली आहेत.

Nov 10, 2012, 11:36 PM IST

पाकिस्तानला महाराष्ट्रात खेळू देणार नाही- राज

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच महाराष्ट्रात खेळू देणार नसल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानची क्रिकेट टीम भारताच्या दौ-यावर येणाराय.

Sep 12, 2012, 07:47 AM IST

राज ठाकरेंवर कारवाई करा- माणिकराव ठाकरे

`राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषणाविरोधात कारवाई करा`, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

Sep 7, 2012, 06:11 PM IST

पाकविरूद्ध सचिन खेळल्यास त्याचं काय?- आशाताई

राज ठाकरे आणि आशाताई यांच्या वादात आता त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ओढलं आहे.

Sep 6, 2012, 02:28 PM IST

राज ठाकरे मनसेच्या नगरसेवकांवर चिडले...

शहरात विरोधी पक्षाचे काही अस्तित्व आहे की नाही? शहराच्या प्रश्नांवर परस्पर निर्णय कसे घेतले जातात’, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली.

Aug 26, 2012, 08:45 PM IST

ठाकरे कुटुंब संघर्षाकडून समेटाकडे ?

राज ठाकरेंनी काढलेल्या मोर्चाचं आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच कौतुक करून दोन्ही बंधुंत कौटुंबीक पातळीवर वाढलेला जिव्हाळा आता राजकारणातही वाढत असल्याचे संकेत दिले....

Aug 23, 2012, 11:54 PM IST

राज ठाकरेंना काँग्रेसने मोठं केलं - आझमी

मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांची बदली करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठे करीत आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.

Aug 23, 2012, 10:24 PM IST

राज ठाकरेंना दिलं फूल, कारवाई होणार?

राज ठाकरे यांना मंचावर जाऊन फूल देऊन आभार मानणा-या पोलीस शिपायाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तावडे दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल,

Aug 22, 2012, 12:03 AM IST

राजगर्जना

राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच गृहमंत्री आऱ.आर पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्यावर तोफ डागली..

Aug 21, 2012, 11:39 PM IST