swipe machine

मुंबईत रेल्वे तिकीट खिडकीवर स्वाईप मशिन, वापरा डेबिट कार्ड

नोटबंदीनंतर मुंबईत लोकल तिकीट तसेच पास काढताना सुट्टे पैसे नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तिकीट खिडकीवर वादावादी पाहायला मिळत आहे. यावर मध्य रेल्वेने कॅशलेस व्यवहार करण्यास प्राधान्य दिले आहे. प्रथम चार स्थानकांवर स्वाईप मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे डेबिट कार्डचा वापर करुन तुम्ही लोकल तिकीट आणि पास काढू शकता.

Dec 14, 2016, 04:08 PM IST

महामार्गावर उद्यापासून टोल आकारणी, स्वाईप मशिनची व्यवस्था

राष्ट्रीय महामार्गांवरती टोल आकारणीला उद्या 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांच्यासाठी स्वाईप मशिनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Dec 1, 2016, 03:25 PM IST