water increase

जायकवाडीचा पाणीसाठा वाढला, मराठवाड्याला दिलासा

मराठवड्याची तहान भागवण्यात महत्वाची भूमिका बजावणारं जायकवाडी धरण आज पहाटे पाच वाजता निम्मं भरलं आहे.  गेल्या २४ तासात धरण्यातल्या पाणी साठी १.१४ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याचा जलसाठा ६४.८९ टीएमसीवर जाऊन पोहचला आहे. दरम्यान धरणपरिसरात गेल्या २४ तासात पाऊस पडलेला नाही.

Aug 2, 2017, 12:06 PM IST

नाशिकमधील पावसामुळे जायकवाडीत विक्रमी पाणीसाठा होण्याची शक्यता

नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणं भरली आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

Jul 28, 2017, 05:21 PM IST

नाशिकमध्ये धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

राज्यभराबरोबर नाशिक जिल्हा परिसरातही मान्सून परतला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात झाला आहे. तेथे 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात 145 मिलीमीटर त्रंबकेश्वर मध्ये 118 मिलीमीटर तर नाशिक तालुक्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Jul 16, 2017, 09:00 AM IST