झिंगाट गाण्यावर आजींचा जबरदस्त डान्स

Updated: Aug 22, 2017, 09:32 AM IST

मुंबई : मराठी सिनेमांचे रेकॉर्ड तोडणाऱ्या सैराट सिनेमाने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. सैराट सिनेमातील गाणी तर ही प्रत्येक कार्यक्रमाचा आता भाग झाली आहेत. लहान असो की मोठे सगळेच या गाण्यावर थिरकण्यासाठी नेहमी तयार असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक आजी झिंगाट गाण्यावर अतिशय सुंदर पद्धतीने डान्स करतांना दिसत आहेत.