Breast Cancer Awareness Month 2022: कर्करोगाची 'ही' 6 लक्षणे तुमच्यात दिसली तर लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या

 'स्तन कर्करोग जागरूकता महिना 2022' या निमित्ताने जाणून घेऊ... स्तन कर्करोग म्हणजे काय? स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे? आणि त्यावरील उपाय...

Updated: Oct 6, 2022, 07:10 PM IST
Breast Cancer Awareness Month 2022: कर्करोगाची 'ही' 6 लक्षणे तुमच्यात दिसली तर लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या title=
Breast Cancer Awareness Month 2022 Consult a doctor soon if you notice these 6 symptoms of cancer nz

What is Breast Cancer: ऑक्टोबर महिना 'स्तन कर्करोग जागरूकता महिना 2022' (Breast Cancer Awareness Month 2022) म्हणून साजरा केला जातो. स्तनाचा कर्करोग कसा प्राणघातक असू शकतो याबद्दल लोकांमध्ये जागृती (Awareness) करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या आरोग्य कार्यक्रमाला "पिंक ऑक्टोबर" (Pink October) असेही म्हणतात.

 'स्तन कर्करोग जागरूकता महिना 2022' या निमित्ताने जाणून घेऊ... स्तन कर्करोग म्हणजे काय? स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे? आणि त्यावरील उपाय...(Breast Cancer Awareness Month 2022 Consult a doctor soon if you notice these 6 symptoms of cancer nz)

स्तनाच्या कर्करोग काय आहे? (What is breast cancer?)

महिलांमध्ये सगळ्यात जास्त सामान्यपणे आढळणारा कर्करोग स्तनाचा कर्करोग (Breast cancer). योग्य उपचार न केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो. स्तनाचा कर्करोग म्हणजे एक किंवा दोन्ही स्तनांमध्ये घातक कर्करोगाच्या पेशींची वाढ होणे. स्तनातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. स्तनाचा कर्करोगाच्या 4 स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये जर लक्षणे कळाल्यास तुम्ही वेळीच उपचार करु शकता. 3 आणि 4 स्टेजला या रोगावर नियत्रंण मिळवणे कठीण जाते. 

आणखी वाचा - unwanted pregnancy: असुरक्षित गर्भपात जीवावर बेतू शकतो, त्यामुळे आधीच करा असं प्लॅनिंग

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे- (Symptoms of breast cancer)

1. स्तनाच्या आकारात कोणताही बदल होणे.
2. स्तनाच्या कोणत्याही भागात वेदना होणे.
3. स्तनाग्रातून दुधाव्यतिरिक्त द्रव स्त्राव होणे.
4. स्तन किंवा अंडरआर्ममध्ये नवीन गाठ तयार होणे.
5. स्तनाग्र आकारात बदल, वेदना किंवा लालसरपणा.
6. स्तनांमध्ये वेदना, सूज, घट्टपणा येणे.

आणखी वाचा - Heart Attach: हार्ट अटॅक आल्यास तुम्ही सुद्धा वाचवू शकता जीव, फक्त करा ही दोन कामं

स्तनाचा कर्करोग उपाय- (Breast Cancer Remedies)

स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राम, अल्ट्रासाऊंड, बायोप्सी इत्यादींचा वापर केला जातो. रुग्णाला औषधे, स्तनाची शस्त्रक्रिया, अत्याधुनिक केसेसमध्ये केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोनल इंजेक्शन्स इत्यादी उपचार दिले जातात.

1. तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. लठ्ठपणामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो.
2. मद्यपान, धुम्रपान इत्यादींचा अतिरेक टाळा.
3. तुम्ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल, तर तुमच्या स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला.