बर्थ कंट्रोलसाठी 'या' कॉन्ट्रासेप्टिव्स पद्धतींचा वापर केला जातो

कॉन्ट्रासेप्टिव्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे बर्थ कंट्रोल करणं शक्य आहे. 

Updated: Feb 20, 2022, 10:57 AM IST
बर्थ कंट्रोलसाठी 'या' कॉन्ट्रासेप्टिव्स पद्धतींचा वापर केला जातो title=

मुंबई : सध्याच्या घडीला मर्यादित कुटुंब हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे बर्थ कंट्रोल करणं शक्य आहे. जेणेकरून जोडपं त्यांच्यानुसार हव्या त्या कॉन्ट्रासेप्टिव्स पद्धतीनी निवड करू शकतात. जाणून घेऊया  कॉन्ट्रासेप्टिव्सच्या विविध पद्धती.

बॅरियर मेथड

बॅरियर मेथडच्या अंतर्गत स्पर्मला एग्जपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात येतं. यासाठी एक बॅरियर तयार केलं जातं. बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्सचं उदाहरण म्हणून कंडोम वापरण्यात येतं.

इंट्रायूटेराइन डिवायसेस 

हे छोटे डिव्हाईस असतात जे प्रोफेशनल्सच्या माध्यमातून यूट्रसमध्ये सोडण्यात येतात. हे डिव्हाईस यूट्रस म्हणजेच गर्भाशयात अंड्याचं फर्टीलायाझेशन होण्यापासून रोखतं. ही एक कॉन्ट्रासेप्शनची प्रभावी पद्धत मानली जाते.

हार्मोनल बर्थ कंट्रोल मेथड

कॉन्ट्रासेप्शनच्या या पद्धतीमध्ये ओव्यूलेशनची प्रक्रिया रोखली जाते किंवा एग फर्टिलायझेशनची प्रक्रिया रोखली जाते. यासाठी बर्थ कंट्रोल पिल्स दिल्या जातात. गर्भनिरोधकाच्या या गोळ्यांमध्ये हार्मोन्सचं कॉम्बिनेशन असतं.

आतात्कालीन कॉन्ट्रासेप्शन

सुरक्षित लैंगिक संबंधानंतर अनवॉन्टेड प्रेग्नेंसीपासून बचाव करण्यासाठी आतात्कालीन कॉन्ट्रासेप्शनच्या पद्धतीचा वापर केला जातो. दरम्यान या पद्धतीचा फार दुरुपयोग केला जातो. या पद्धतीचा फक्त आतात्कालीन परिस्थितीत वापर केला पाहिजे. असुरक्षित लैंगिक संबंधांच्यानंतर हे औषधं 72 तासांच्या आत घेतलं पाहिजे. कारण याच काळामध्ये शरीरात ओव्हुलेशनची प्रक्रिया सुरू होते.