Breastfeeding करताना महिला हमखास करतात 'या' चुका!

स्तनपान करताना ब्रेस्टची काळजी घेणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे. 

Updated: May 29, 2022, 01:17 PM IST
Breastfeeding करताना महिला हमखास करतात 'या' चुका! title=

मुंबई : बाळासाठी स्तनपान हे फार महत्त्वाचं आहे. आईच्या दुधामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र स्तनपान देताना मातांनीही काळजी घेतली पाहिजे. स्तनपान करताना ब्रेस्टची काळजी घेणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे. म्हणून स्तनपान करताना ब्रेस्ट हेल्दी ठेवण्यासाठी काही खास टीप्स मातांन फॉलो केल्या पाहिजे.

Sore आणि cracked निप्पल्सच्या समस्येवर उपाय

महिलांनी क्रॅक निप्पल्सकडे दुर्लक्ष करू नये. स्तनपानाच्या सुरुवातीच्या काळात Sore आणि cracked निप्पल्सची समस्या उद्भवते. दूध पाजण्यासाठी बाळाला चुकीच्या पद्धतीने पकडणे हे त्यामागे कारण आहे. ही समस्या दूर करण्यासाठी त्याकडे योग्य लक्ष देणं गरजेचेंआहे. याकडे दुर्लक्ष केल्यास स्तनपान करताना त्रास होतो. 

क्रीम लावू नका

स्तनपानाच्या वेळी स्तनांना कोणतंही क्रीम लावू नका. स्तनपानाच्या वेळेस Sore आणि cracked निप्पल्सला ऑईन्मेंट किंवा क्रीम लावणं टाळावं. कारण त्यात असलेल्या केमिकल्समुळे बाळाला त्रास होऊ शकतो. यामुळे पचनाचे विकार, उलट्या अशा समस्या उद्भवतील. 

साबण लावू नका

क्रॅक निप्पल्स स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करणं टाळा. त्यामुळे त्या भागातील नैसर्गिक मॉईश्चर निघून जाईल आणि निप्पल्स ड्राय होतात. यामुळे स्तनपान करताना त्रास होऊ शकतो.

घट्ट ब्रा घालणं टाळा

स्तनपानाच्या काळात नर्सिंग ब्रा वापरणं योग्य पर्याय आहे. यामुळे ब्रेस्टचा आकार योग्य राखला जाईल. शिवाय यामुळे ब्रेस्टला सपोर्ट मिळेल. टाईट ब्रा खूप वेळ घातल्यास त्रास होण्याची शक्यता आहे.