पत्नीसोबत मॉलमध्ये कंटाळणाऱ्या 'बिचाऱ्या' नवऱ्याला दिलासा

पत्नीसोबत शॉपिंगला कंटाळणाऱ्या नवऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महिलांची मॉलमध्ये तासनतास शॉपिंग सुरू असते.

Updated: Jul 15, 2017, 02:30 PM IST
पत्नीसोबत मॉलमध्ये कंटाळणाऱ्या 'बिचाऱ्या' नवऱ्याला दिलासा title=

बिजिंग : पत्नीसोबत शॉपिंगला कंटाळणाऱ्या नवऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महिलांची मॉलमध्ये तासनतास शॉपिंग सुरू असते. या दरम्यान बिचाऱ्या नवऱ्याचे खूप हाल होतात, त्याला रस नसतानाही हो हो, नाही नाही, असं म्हणत किंमत विचारात, सांगत त्याचा वेळ जातो. बायको सांगेल तिकडे तिच्या मागे मागे फिरावं लागतं, त्याची आठवड्याची सुटी अशीच जाते, आणि आराम तर सोडा, पण आनंदात त्याला हवा तसा वेळही घालवता येत नाही.

नवऱ्याचं हे दु:ख चीनमधील एका शॉपिंग मॉलने ओळखलं आहे. त्यांनी शॉपिंग मॉलमध्ये काही काचेची केबिन्स बनवली आहेत, बायकोची मॉलमध्ये शॉपिंग सुरू असताना, यात नवरा बिनधास्त बसून व्हिडीओ गेम खेळू शकतो, सिनेमा पाहू शकतो, इंटरनेट सर्फिंग करू शकतो. नव्वदच्या दशकातले व्हिडीओ गेम्स येथे देण्यात आलेले आहेत. संबंधित नवऱ्याचा लहानपणाचा आवडता गेम यामुळे त्याला खेळायला मिळेल असा अंदाज बांधण्यात आला आहे.

सुरूवातीला ही सेवा फ्री देण्यात येत आहे, मात्र काही दिवसांनी ही सेवा पेड करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे, अर्थात ही सेवा किती लोकप्रिय होते यावर अवलंबून असणार आहे.