दातदुखी जाणवतेय? सावधान व्हा...हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं

दातांमध्ये सतत वेदना होत असतील तर काळजी घ्या.

Updated: May 15, 2022, 08:40 AM IST
दातदुखी जाणवतेय? सावधान व्हा...हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं title=

मुंबई : दातांमध्ये सतत वेदना होत असतील तर काळजी घ्या. असं असेल तर तुमचं हृदय तुम्हाला सर्वात मोठा धोक्याचा सिग्नल देतंय. सहसा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, रुग्णाला छातीत दुखणं किंवा खूप घाम येणं, चक्कर येणं अशा तक्रारी जाणवतात. 

मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालांनुसार, हृदयविकाराच्या काही अत्यंत आश्चर्यकारक लक्षणांबद्दल सांगितलं गेलंय. यामध्ये सर्वात धक्कादायक लक्षण म्हणजे दात किंवा जबडा दुखण्याची तक्रार. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, थकवा येणं, जबडा, दातदुखी आणि पाठदुखी असा त्रास होत असल्यास काळजी घ्या. हे हृदयविकाराचा झटका येण्याचं लक्षण असू शकतं.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, छातीत वेदना नसताना हृदयविकाराचा झटका हा महिलांसाठी प्राणघातक आहे. कारण यावेळी रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याचं कळत नाही आणि डॉक्टरांना याचं निदान करण्यास विलंब होतो. 

येल-न्यू हेवन रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अलेक्झांड्रा लॅन्स्की यांनी सांगितले की, एका महिलेने तिच्या जबड्यात दुखत असल्याची तक्रार अनेक डॉक्टरांकडे केली. सर्वांनी महिलेला डेंटिस्टकडे पाठवले. डेंटिस्टने त्याचे दोन दात काढले. तरीही वेदना कमी झाल्या नाहीत. त्यानंतर ती माझ्याकडे आली. तपासात वेदनांची तार हृदयाशी जोडलेली असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली. यानंतर तिच्या दातांचं दुखणं कमी झालं आहे.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ.जॅकलिन टॅमिस-हॉलंड यांच्या मते, पुरुषांपेक्षा महिला हृदयविकाराच्या झटक्याचा धोका जास्त मानत नाहीत. उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा 35 ते 54 वयोगटातील महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या जोखमीशी संबंधित आहे.