Women Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी 'ही' वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?

Women Secrets : जगभरात दर दिवशी अशा काही गोष्टी समोर येतात ज्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका निरीक्षणाची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आणि ती वाचून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

Updated: Feb 21, 2023, 11:41 AM IST
Women Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी 'ही' वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा? 	 title=
छाया सौ-न्य - www.vindolanda.com

Roman Wooden Phallus: जग कितीही पुढे गेलं असलं तरीही काही मुद्द्यांवर मात्र अद्यापही खुलेपणानं बोललं किंवा व्यक्त होणं वर्ज्यच. अनेकांनीच अशा परिस्थितीचा सामना केला असेल. मुख्य म्हणजे ते मुद्दे कोणते हेसुद्धा सांगण्याची गरज नाही. कारण जग प्रगतीच्या वाटांवर चालत असलं तरीही दैनंदिन जीवनातील काही विषय आजही न्यूनगंडामुळं दुर्लक्षित राहतात. शरीरसंबंध आणि त्याविषयीचे समज - गैरसमज हा त्याचाच एक भाग. 

शरीरसंबंध (Physical relationship) आणि त्याबाबतच्या विचित्र धारणांमुळं आज काही समाज असेही आहेत जे याकडे अतिशय नकारात्मकतेनं पाहतात, त्याविषयी बोलणं टाळतात. बऱ्याचदा काही खासगी शारीरिक समस्या यामुळं प्रकाशातही आणल्या जात नाहीत. 21 व्या शतकात ही अवस्था तर, विचार करा 2000 वर्षांपूर्वी नेमकी काय परिस्थिती असेल.... 

काही अंदाज बांधता येतोय? तुमचं उत्तर इथं चुकू शकतं, कारण दोन हजार वर्षांपूर्वी शरीरसंबंध, शारीरिक गरजा या साऱ्याबाबत थक्क करणारी परिस्थिती होती. Vindoland येथील Roman Fort परिसरात करण्यात आलेल्या उत्खननातून समोर आलेली वस्तू आणि त्यानंतर त्यावर केलं गेलेलं संशोधन, निरीक्षण पाहता हेच स्पष्ट होतंय. पण, त्याबद्दलही दुमत आहेच. (2000 year ago a wooden object received from excavation used to satisfy womens lust photo goes viral )

काय आहे ही वस्तू? 

उत्खननातून समोर आलेली ही वस्तू महिला शारीरिक गरजा भागवण्यासाठी वापरत असत असं एका निरीक्षणातून नुकतच जगजाहीर करण्यात आलं आहे. अनेक जुन्या वस्तू, चपला आणि कपड्यांच्यामध्येच ही वस्तू पडलेली आढळून आली. 

संशोधक आणि अभ्यासकांच्या गटात असणाऱ्या डॉ. रॉब कॉलिन्स यांच्या म्हणण्यानुसार 'जर 6.3 इंच लांब लाकडाची ही वस्तू त्या काळातील Sex Toy आहे, तर ही अशा प्रकारच्या वापरातील ब्रिटनमधील सर्वात जुनी वस्तू ठरू शकते'. 1992 मध्ये विन्डोलँडमधील एका (Roman Empire) रोमन साम्राज्यातील किल्ल्यातून ही वस्तू जगासमोर आली होती. उत्तर इंग्लंडमधील हैड्रियनच्या भीतीच्या दक्षिणेला हा भाग असल्याचं म्हटलं जातं. या वस्तूच आकार आणि प्रकार पाहता तिचा वापर नेमका कशासाठी होत होता याचा अंदाज तज्ज्ञांना लावता आला आहे. 

लाकडी वस्तू आणि तिच्या वापरावरून सुरु असणारी चर्चा 

दरम्यान, न्यू कॅसल युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी कॉलेज डबलिनमधील तज्ज्ञांनी मात्र या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोमन साम्राज्यातील जनता वाईट प्रवृती आणि कोणाच्याही वक्रदृष्टीपासून सुरक्षित राहण्यासाठीसुद्धा अशा प्रकारच्याच लाकडापासून तयार करण्यात आलेल्या एका वस्तूचा वापर करायची. पण, या लाकडी वस्तूचा आकार पाहता फक्त वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच तिचा वापर केला गेला नव्हता असंही संशोधकांच्या एका गटाचं म्हणणं आहे. 

हेसुद्धा वाचा : Crime news : प्रायव्हेट पार्ट शिजवून खाल्ला; माथेफिरुचे किळसवाने कृत्य पाहून पोलिसही हादरले

सध्या या वस्तूच्या वापरावरून अनेक दावे करण्यात येत आहेत. काही अभ्यासकांच्या मते सौंदर्य प्रसाधन किंवा एखाद्या औषधाची घुटी तयार करण्यासाठीसुद्धा या वस्तूचा वापर केला गेला असाला. किंवा ती एखाद्या मूर्तीचाही भाग असू शकते. असं असलं तरीही रोमन किल्ल्यातून यासंदर्भातील कोणतीही मूर्ती समोर आलेली नाही. 

सदरील निरीक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या डॉ. रॉब सँड्स यांच्यामते प्राचीन काळात अशा प्रकारच्या लाकडी वस्तू अतिशय सर्वसामान्य होत्या. पण, त्यांचा वापर मात्र विशिष्ट परिस्थित करतच त्या जपून ठेवल्या जात होत्या. अंधार, दमट आणि एखाद्या ऑक्सिजनविरहित ठिकाणी अशा वस्तू ठेवल्या जात होत्या. त्यामुळंच ही वस्तू अनेकांसाठीच आकर्षणाचा विषय ठरत असून, ती सध्या विन्डोलँडमधील संग्रहालात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.