इंडोनेशियात पुन्हा त्सुनामीची शक्यता, आतापर्यंत ४२० लोकांचा मृत्यू

 समुद्रकिनाऱ्या जवळील रहिवाशांना सावध करण्यात आले आहे

Updated: Dec 25, 2018, 04:01 PM IST
 इंडोनेशियात पुन्हा त्सुनामीची शक्यता, आतापर्यंत ४२० लोकांचा मृत्यू title=
Pic Courtesy : PTI

 

इंडोनेशिया: इंडोनेशियामध्ये त्सुनामीत अनेक लोकांना जीव गमवावा लागला. गेल्या शनिवारी आलेल्या त्सुनामीत मृत्यूच्या जाळ्यात अडकलेल्याची संख्या ३७३ होती. या संख्येत आणखी भर पडू शकते. त्सुनामी आलेल्या भागात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. अद्याप मदतकार्य सुरू असताना आणखी मोठ्या त्सुनामीची शक्यता सरकारकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच समुद्रकिनाऱ्याजवळील रहिवाशांना सावध करण्यात आले आहे. सुंडाखाडीच्या दोन्ही बाजूस असलेल्या जावा आणि सुमात्रा भागातील लोकांना त्सुनामीमुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. 

 

आतापर्यंतची माहिती 

त्सुनामीत शेकडो इमारती नष्ट झाल्या आहेत. जावा आणि सुमात्रा बेट लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. त्याचबरोबर शनिवार सुटीचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी जास्त गर्दीचा जमाव झाला होता. इंडोनेशिया सरकारच्या माहितीनुसार त्सुनामीत १४०० जण जखमी झाले आहेत. तसेच १२८ जण अजूनही बेपत्ता आहेत. 

समुद्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हालचालीमुळे उंच लाटा निर्माण झाल्या. त्यामुळे त्सुनामी उदभवली. जावा आणि सुमात्रा या प्रभावित भागात अजूनही आपात्कालीन सुविधा पुरविण्यात येत आहेत.