'भारत-अमेरिका दरम्यान व्यापार करार, ५० हजार नोकऱ्या निर्माण होणार'

डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य अशावेळी समोर आलं जेव्हा भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल मंगळवारी लाइटहाइजरसोबत चर्चा करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत.

Updated: Sep 25, 2019, 09:00 AM IST
'भारत-अमेरिका दरम्यान व्यापार करार, ५० हजार नोकऱ्या निर्माण होणार' title=

न्यूयॉर्क : भारत आणि अमेरिका लवकरच एका व्यापार करार संबंध प्रस्थापित करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केलीय. उभय देशांच्या गट एका सीमित व्यापार पॅकेजवर (लिमिटेड ट्रेड पॅकेज) चर्चा करत आहेत, अशीही माहिती ट्रम्प यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा सुरु करण्यापूर्वी ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. भारत आणि अमेरिके दरम्यान व्यापार करार होत आहे का? या प्रश्नावर ट्रम्प उत्तरले 'हो, मला वाटतं लवकरच' 

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यात आपण शनिवारी ह्युस्टनमध्ये पेट्रोनेट आणि टेल्यूरियन दरम्यान झालेल्या २.५ अरब डॉलर करारावर आनंदी असल्याचं म्हटलं होतं. या करारामुळे ६० अरब डॉलरचा व्यापार होईल आणि ५०,००० नोकऱ्या निर्माण होतील, असंही त्यांनी म्हटलं होतं. 

यापूर्वी, आपल्याकडे मोदींशी चर्चा करण्यासाठी अनेक मुद्दे आहे. यातील एक संभवत: आणि मोठा मुद्दा व्यापाराचा आहे. 'आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पुढे वाटचाल करतोय. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी बॉब लाइटहाइजर इथं उपस्थित आहेत. ते भारत आणि त्यांच्या सक्षम प्रतिनिधींसोबत करारावर चर्चा करत आहेत. मला वाटतं लवकरच आपण एका व्यापार करारावर पोहचू' असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं.

उल्लेखनीय म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य अशावेळी समोर आलं जेव्हा भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल मंगळवारी लाइटहाइजरसोबत चर्चा करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत.