शरिया कायदा नेमका काय आहे? यात महिलांसाठी कोणते कठोर कायदे आहेत?

यावेळी त्याने पुढच्या योजनांवरही चर्चा केली आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेईल अशी भूमिकाही त्याने यावेळी मांडली.

Updated: Aug 19, 2021, 02:43 PM IST
शरिया कायदा नेमका काय आहे? यात महिलांसाठी कोणते कठोर कायदे आहेत? title=

मुंबई : अफगाणिस्तानात फार वेगानं सध्या घडामोडी घडत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर सर्वत्र तणावाचं वातावरण आहे. बुरखा खरेदीकरण्यासाठी महिलांची दुकानांबाहेर तुफान गर्दी आहे. तर तालिबान तिथल्या लोकांना आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या तयारीत आहेत. तालिबानी आपला मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता मीडियाचा वापर करण्याचं तंत्र अवलंबल्याचं दिसत आहे. त्यातून त्यांनी आपली इमेजही बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

तालिबानच्या प्रवक्याने पहिल्यांदाच महिला अँकरला मुलाखत दिली आहे. या घटनेमुळे सर्वजण तालिबानच्या या भूमिकेकडे आश्चर्याने पाहात आहेत. अफगाण महिला अँकर बेहेश्ता यांना तालिबान प्रवक्ता अब्दुल हक हम्मादने मुलाखत दिली आहे. 

यावेळी त्याने पुढच्या योजनांवरही चर्चा केली आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेईल अशी भूमिकाही त्याने यावेळी मांडली. सध्या त्याच्यासाठी लोकांचं मन आणि डोकं जिंकणं महत्त्वाचं आहे.

मंगळवारी तालिबानच्या प्रवक्याने सांगितले की, "आमच्या समाज वर्तुळात महिलांचा सक्रीय सहभाग आम्हाला हवा आहे. आमच्या चौकटीत राहून महिलांनी नोकरी किंवा शिक्षण घेतलं तर आमची त्याला काही हरकत नाही. अफगाणिस्तान हा इस्लाम धर्माच्या चौकटीत चालेल,"

त्यामुळे जिकडे तिकडे चर्चा आहे ती, शरिया कायद्याची. त्यामुळे हा कायदा काय आहे हे सोप्या शब्दांमध्ये जाणून घेऊ या.

काय आहे शरिया कायदा? 

तालिबानने पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मुस्लीम कायद्यात महिलांना जेवढं स्वातंत्र्य आहे, तेवढं त्यांना मिळेल. परंतु हे स्वातंत्र्य नेमकं किती मिळणार? तर मुस्लीम धर्मग्रंथ कुराण आणि त्यांच्या धर्मगुरूंनी वेळोवेळी काढलेले फतवे यांचा मिळून जो कायदा तयार झाला, त्याला शरिया कायदा म्हणतात. शरिया या शब्दाचा अर्थ 'स्वच्छ, आखून दिलेला रस्ता' असा आहे. म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार तेथील महिलांनी याच कायद्याप्रमाणे रहावे.

शरिया कायद्यात प्रार्थना, उपवास, गरिबांसाठी दान देणं या सगळ्याचा समावेश आहे, ज्याला मुस्लीम धर्मात जकात असं म्हणतात. जन्म, मृत्यू, लग्न इतकंच काय दिनक्रमाविषयी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वं यात आहेत.

अनेक देशांमध्ये मुस्लीम धर्मियांवर शरिया कायद्याचा इतका पगडा आहे की, एखाद्या मित्राने कार्यालयातलं काम संपल्यावर पबमध्ये बियर पिण्यासाठी बोलावलं तरी मुस्लीम व्यक्ती कधी कधी स्थानिक धर्मगुरूंकडे सल्ला मागतात.

20 वर्षांपूर्वी जेव्हा अफगाणिस्तानात तालिबानची पहिली राजवट होती, तेव्हा शरिया कायदा पाळण्याची सक्ती अफगाण जनतेवर करण्यात आली होती.

यात पुरुषांनी दाढी ठेवणं, पारंपरीक मुस्लीम वेश परिधान करणं यांची सक्ती होती. तर महिलांवर त्याहून जास्त बंधनं ठेवली गेली होती. महिलांसाठी घराबाहेर पडताना संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा बंधनकारक झाला. वडील, पती किंवा मुलगा बरोबर नसेल तर महिलांना घराबाहेर पडणं अशक्य होतं. वयाच्या तेराव्या वर्षानंतर मुलींचं शिक्षण बंद. चित्रपट पाहणे, सामाजिक कार्यक्रम या सगळ्यावर कडक बंधनं होती.

कारण तुमचे घरगुती नातेसंबंध, अर्थविषयक व्यवहार, नोकरी, उद्योग, लग्न, घटस्फोट अशा सगळ्याविषयी शरियामध्ये कायदे आहेत, आणि ते पाळले नाहीत तर काही शिक्षासुद्धा आहेत.

या कायद्यात निर्णय कसा घेताला जातो?

शरिया, कोणत्याही कायदेशीर व्यवस्थेप्रमाणे, कठोर आहेत. त्याची अंमलबजावणी पूर्णपणे तज्ञांच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या शिक्षणावर अवलंबून असते.
इस्लामिक कायद्याचे न्यायाधीश मार्गदर्शन आणि निर्णय जारी करतात. मार्गदर्शनाला फतवा म्हणतात.

हा कायदा अफगाणिस्तानात तालिबान्यांनी या आधी देखील बंधनकारक ठेवण्यात आला होतं. परंतु आता ते या कायद्याची कशी अंमलबजावणी करतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.