मजा मस्करीत महिलेनं केली DNA टेस्ट, पण त्याच्या रिझल्टने मात्र तिला धक्काच बसला...

 जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांबद्दल किंवा नातेवाईकांबद्दल जाणून घ्यायचं असेल, डीएनए चाचणी केली जाते.

Updated: Jul 18, 2022, 04:12 PM IST
मजा मस्करीत महिलेनं केली DNA टेस्ट, पण त्याच्या रिझल्टने मात्र तिला धक्काच बसला... title=

मुंबई : जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांबद्दल किंवा नातेवाईकांबद्दल जाणून घ्यायचं असेल, डीएनए चाचणी केली जाते. तसेच एखाद्या मेलेल्या व्यक्तीच्या बॉडिची ओळख पटवायची असेल तर, पोलिसांना या डीएनए टेस्टची मदत घ्यावी लागते. परंतु डीएनए चाचणीत अनेकवेळा अशा गोष्टी समोर येतात की, ज्यामुळे मोठा धक्का बसतो. नुकताच असाच प्रकार एका अमेरिकन महिलेसोबत घडला जिने केवळ कुतूहल आणि गंमत म्हणून डीएनए चाचणी केली.

द सन वेबसाइटच्या वृत्तानुसार, 41 वर्षीय माइया इमॉन्स-बोरिंग तिचा पती ब्रेंट आणि 16 वर्षीय मुलगी लॅरिसासोबत टेक्सास येथे राहते. ऑक्टोबर 2018 मध्ये, तिने एक जाहिरात पाहिली ज्यामध्ये दावा केला होता की, घरी बसलेले लोक त्यांची DNA चाचणी करू शकतात , ज्याचा अहवाल काही दिवसात प्राप्त होईल. त्यावेळी या महिलेला आपल्या पूर्वजांबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा झाली, म्हणून तिने देखील चाचणी घेण्याचा विचार केला.

पण या चाचणीचा रिझल्टवरुन जे समोर आलं, त्यांमुळे ही महिला थक्कं झाली. कारण तिला कळले की, ही महिला ज्या व्यक्तीला आपले वडील समजत होती, ते तिचे जैविक वडिल नाही.

जेव्हा यामहिलेची 69 वर्षीय आई शेरिल, 67 वर्षीय वडील जॉन, 36 वर्षीय आणि 29 वर्षांची बहीण तहनी-ग्रेस यांना हे कळले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यानंतर आई-वडिलांनी मुलीसमोर त्यांचं हे रहस्य उघड केलं.

त्यांनी सांगितले की, वडिलांना वयाच्या १८ व्या वर्षी टेस्टिक्युलर कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, त्यामुळे ते वडील होऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलच्या मदतीने अज्ञात स्पर्म डोनरकडून पालक होण्याचा निर्णय घेतला. पालकांनी सांगितले की, यापूर्वी दोन मुले शुक्राणू दानातून जन्माला आली होती, तर धाकटी मुलगी ही त्यांच्यासाठी एक वरजान होतं कारण ती एकटीच त्यांची मुलगी होती.

यानंतर, मायाला डीएनए चाचणी कंपनीकडून आणखी एक मेल आला, ज्यात दावा केला होता की ती मायाची सावत्र बहीण आहे. त्यानंतर महिलेने डीएनए अहवालाद्वारे ऑनलाइन फॅमिली ट्री बनवणाऱ्या साइट्सशी संपर्क साधला आणि एकूण 18 महिला सापडल्या ज्या तिच्या सावत्र बहिणी होत्या. त्यानंतर त्याच्या संशयाचे रूपांतर विश्वासात झाले की, अज्ञात दात्यांऐवजी उपचार करणाऱ्या डॉक्टरने स्वत:चे स्पर्म देऊन महिलांच्या कुटुंबाला पुढे नेलं आहे.

यानंतर महिलेने हॉस्पिटल आणि आता 80 वर्षीय डॉक्टर जोन्स यांच्यावर कोर्टात दावा दाखल केला आणि गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दानाबद्दल रुग्णाला माहिती न देता तिचे स्पर्म दान केल्याबद्दल कोर्टाने त्यांना दोषी ठरवले.