Elon Musk यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक्स गर्लफ्रेंडने Twitterला का केला रामराम? जाणून घ्या

Amber Heard : Elon Muskची माजी प्रेयसी हिने चक्क Twitter Account ब्लॉक करुन टाकले. तिने ट्विटरला कायमचा बाय बाय केलाय. तिने असे पाऊल का उचलले याचीच जोरदार चर्चा आहे.

Updated: Nov 5, 2022, 03:04 PM IST
Elon Musk यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक्स गर्लफ्रेंडने Twitterला का केला रामराम? जाणून घ्या title=

Amber Heard Twitter Account : जगातील सर्वाधिक श्रीमंतापैकी एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर खरेदी केले. याची जोरदार चर्चा झाली नसेल पण त्यांनी कामावरुन काढून टाकलेल्यांची चर्चा जास्त होत आहे. आता तर Elon Muskची माजी प्रेयसी हिनेही चक्क  Twitter Account ब्लॉक करुन टाकले. तिने ट्विटरला कायमचा बाय बाय केलाय. तिने असे पाऊल का उचलले याचीच जोरदार चर्चा आहे.

अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक निर्णय घेऊन लोकांना आश्चर्यचकित केले आहे. एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आघाडीचे ट्विटर $ 44 बिलियनला विकत घेतले. त्यानंतर त्यांनी अनेक मोठे बदल केले आहेत, जसे की कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. अनेक उच्च अधिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे. तसेच  ट्विटर ब्लू टिक्ससाठी $8 आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

आता मात्र, त्यांनाच एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे एक्स गर्लफ्रेंडने Twitterला कायचा बाय बाय केलाय. सोशल मीडियावरील अनेकांचा असा विश्वास आहे की एलॉन मस्कने नवीन बॉस म्हणून ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर अँबर हर्डने तिचे ट्विटर खाते हटवले आहे. अँबर हर्ड ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिची आणि एलॉन मस्क मैत्री होती. दोघेही एकमेकांना डेट करत होती. मात्र, त्यांच्यात बिनसल्यानंतर ते दोघांपासून अंतर राखून आहेत. मात्र, अभिनेत्री Amber Heard हिला आजही ट्रोलिंग केले जात आहे.

अचानक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन गायब 

एलोन मस्कने ट्विटर विकत घेताच त्यांची एक्स गर्लफ्रेंड अंबर हर्डचे ( Amber Heard) अकाउंट अचानक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन गायब झाली. याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली. दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विटरची कमान हाती घेतल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी स्वतःहून त्यांची खाती हटवण्यास सुरुवात केली असली तरी अंबर हर्ड हिचे अकाऊंट (Amber Heard Twitter Account) तिने ब्लॉक केल्याचे अनेकांना ते पडलेले नाही. 

अँबर हर्डने तिचे ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केल्याची माहिती आहे. अंबरचा माजी पती जॉनी डेपने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या खटल्याला गती मिळाल्यापासून, अंबर हर्ड हिला प्रचंड द्वेष आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबाबत चर्चा आणि वाद टाळण्यासाठी तिने स्वतःहून ट्विटर सोडले असावे. किंवा याचा एलॉन मस्कशी काही संबंध आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

एलोन मस्क आणि अँबर हर्डची प्रेमकहाणी

2016 मध्ये, या जोडीने त्यांच्या नात्याबद्दल सार्वजनिकरित्या खुलासा केला. परंतु गेल्या एक वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. जे त्यांनी गुप्त ठेवले. मात्र, 2018 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघेही वेगळे झाले.

दोघांची पहिली भेट 2013 मध्ये ‘मचेटे किल्स’च्या सेटवर झाली होती. हर्डने या चित्रपटात अभिनय केला आणि मस्क यांनी फक्त एक कॅमिओ केला. त्यावेळी, मस्क त्यांची तत्कालीन पत्नी तल्लुलाह रिलेसोबत होते आणि हर्ड तत्कालीन पती डेपसोबत होती.