US राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घरी नव्या पाहुण्याचं उत्साहात स्वागत, Video व्हायरल

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.   

Updated: Dec 21, 2021, 12:23 PM IST
US राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घरी नव्या पाहुण्याचं उत्साहात स्वागत, Video व्हायरल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : अमेरिकेचे (US) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी त्यांच्या कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

ख्रिसमसला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच अमेरिकेमध्ये सध्या काहीसं उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. अर्थात कोरोनाची दहशतही यामध्ये सर्वांनाच सतावत आहे. 

या सर्वच वातावरणात बायडन यांच्या कुटुंबात आलेल्या या पाहुण्यानं वातावरण आनंदी केलं आहे. 

कमांडर, असं या नव्या पाहुण्याचं नाव. खुद्द राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीच ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याची पहिली झलक सर्वांच्या भेटीला आणली. 

हा पाहुणा म्हणजे जर्मन शेपर्ड या प्रजातीचा देखणा श्वान. व्हाईट हाऊसमध्ये ख्रिसमसची सजावट झालेली असतानाच कमांडरचं येणं सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणत आहे. 

जो बायडन आणि त्यांची पत्नीसुद्धा त्याच्यासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये हेच खास क्षण पाहायला मिळत आहेत. 

जो बायडन यांना कमांडर, त्यांचा भाऊ जेम्स बायडन आणि भावाची पत्नी, सारा बायडन यांच्याकडून वाढदिवसाच्या भेट स्वरुपात देण्यात आला आहे. 

1 सप्टेंबरला कमांडरचा जन्म झाला होता. ज्यानंतर 20 डिसेंबरला तो व्हाईट हाऊसमध्ये आला. 

सूत्रांच्या माहितीनुसार जर्मन शेपर्ड प्रजातीचाच एक श्वान बायडन यांच्याकडे होता.

वयाच्या 13 व्या वर्षी त्याचं निधन झालं होतं. पण, आता मात्र कमांडरच्या येण्यानं चॅम्पची पोकळीही भरुन निघेल यात शंका नाही.