कोरोनाकडे दुर्लक्ष करणं 'अंडरटेकर'ला पडलं भारी, अति आत्मविश्वासामुळे गमावला जीव

कोरोनाकडे दुर्लक्ष करणं पडलं भारी 

Updated: Dec 28, 2021, 09:01 AM IST
कोरोनाकडे दुर्लक्ष करणं 'अंडरटेकर'ला पडलं भारी, अति आत्मविश्वासामुळे गमावला जीव  title=

मुंबई : तीन वेळा किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन राहिलेले फ्रेडरिक सिनिस्ट्रा यांचे वयाच्या 41 व्या वर्षी निधन झाले आहे. फ्रेडरिक सिनिस्ट्राला अंडरटेकरला देखील ओळखलं जातं. फ्रेडरिक सिनिस्ट्राला कोरोनाची लागण झाली होती. मात्र या कोरोनाशी स्वतःच्या हिंमतीवर दोन हात करण्याचा निर्णय आहे. 

कोरोनाकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात 

हट्टामुळे फ्रेडरिक सिनिस्ट्रा यांनी लस घेतली नाही. फ्रेडरिक सिनिस्ट्रा सुरूवातीपासूनच कोरोनाचे नियम स्वीकारण्यास नकार देत, हा मूर्खपणा आहे म्हणत असे. याच कारणामुळे त्याला कोरोनाची लसही घेतली नाही.

बर्‍याच लोकांप्रमाणे, अंडरटेकरचा कोरोना विषाणू आणि त्याच्या लसीवर विश्वास नव्हता. हा सगळा फसवा प्रकार असल्याचं तो समजत होता. जी व्यक्ती  शारीरिकदृष्ट्या मजबूत असेल त्याला याचा धोका नसेल असा अंडरटेकरचा विश्वास होता. 

फ्रेडरिक सिनिस्ट्राही गंमतीने म्हणत असे की, त्याला कोरोनाशी दोन हात करावे लागले तरी तो त्याच्या वैयक्तिक ताकदीने पराभव करेल. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने कोरोना नियमांच अंडरटेकर उल्लंघन करत आहे. 

अखेर नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने अंडरटेकला गाठलच. अगदी सुरुवातीच्या काळातही, त्याने स्वत:ला सर्वात शक्तिशाली व्यक्ती असा उल्लेख करून कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. 

अति आत्मविश्वासामुळे गमावला जीव 

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे फ्रेडरिक सिनिस्ट्राची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. अखेर त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना सक्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि उपचारा अभावी त्यांचा मृत्यू झाला.

फ्रेडरिक सिनिस्ट्रा यांना रुग्णालयात आणले असता त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रूग्णालयात दाखल होण्याच्या वेळीही, त्याला स्वतःवर विश्वास होता आणि त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की तो या आजारातून जिंकून लवकरच आपल्या लोकांकडे परत येईल. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी देखील आपल्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला यावर विश्वास ठेवायला तयार नाही.