खरंखुरं Man Vs Wild; पॅसिफिक महासागरात बेपत्ता झालेल्या व्यक्तीनं कच्चे मासे खाऊन काढले दिवस आणि मग...

Man Lost in Pacific Ocean : समुद्र जितका अथांग दिसतो तितकाच तो धडकीही भरवतो. कारण, अनेकदा याच विस्तीर्ण समुद्रात प्रवासासाठी निघालेल्या काहींना परतीच्या वाटा गवसत नाहीत... 

सायली पाटील | Updated: Jul 18, 2023, 01:45 PM IST
खरंखुरं Man Vs Wild; पॅसिफिक महासागरात बेपत्ता झालेल्या व्यक्तीनं कच्चे मासे खाऊन काढले दिवस आणि मग... title=
(छाया सौजन्य - Sky News Australia) / Australian man with his dog lost in Pacific Ocean for 60 days survived on rain and raw fish

Man Lost in Pacific Ocean : संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. पण हा संघर्षसुद्धा आपली परीक्षा पाहू लागल्यावर मात्र पायाखालची जमीन सरकते. बऱ्याचदा आयुष्य नेमकं कोणत्या वळणावर जाणार आहे याचा अंदाजही येत नाही. अशा वेळी इच्छाशक्तीच आपल्याला मोठ्यातल्या मोठ्या संकटातून तारण्यास मदत करते, अनेकदा इतरांसाठी प्रेरणाही ठरते. सध्या अशीच एक घटना संपूर्ण जगाला थक्क करून सोडत आहे. कारण, इथं जगण्यासाठीच्या संघर्षाचा विजय झाला आहे. 

साधारण मागील दोन महिन्यांपासून जगातील सर्वात मोठ्या महासागरात बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा आणि त्याच्या श्वानाचा शोध घेण्यात यंत्रणांना यश मिळालं आहे. दरम्यानच्या काळात कोणतीही मदत नसताना या व्यक्तीनं पावसाचं पाणी आणि कच्ची मासळी खाऊन या अशक्य प्रसंगी स्वत:चा आणि श्वानाचाही जीव वाचवला. ही घटना कोणा एका चित्रपटाची पटकथा किंवा Man Vs Wild या बेअर ग्रिल्सच्या कार्यक्रमाचा एपिसोड वाटतेय ना? पण, तसं नाहिये. ही घटना प्रत्यक्षात घडलीये. (Australian man with his dog lost in Pacific Ocean for 60 days survived on rain and raw fish)

समुद्र आणि ते दोघं... 

टिम शेडॉक असं त्या व्यक्तीचं नाव असून, आपल्या श्वानासोबत ते एप्रिल महिन्यात मेक्सिकोपासून काही अंतरावर असणाऱ्या ला पाजमधून ते एका कॅटामरेनमधून निघाले होते. उष्णकटिबंधीय फ्रेंच पोलिनेशियातून निघण्यापूर्वी त्यांनी जवळपास 6000 किलोमीटर (3700 सागरी मैल) इतकं अंतर ओलांडण्याची योजना आखली होती. पण, काही काळातच आपण पॅसिफिक महासागरात फसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पुढं आणखी एक संकट ओढावलं. ते म्हणजे जहाजाचं मोठं नुकसान होणं. समुद्रात फसलेल्या त्यांच्या जहाजातील विद्युत उपकरणं बिघडली आणि संकटं आणखी बळकट होत गेली. 

जवळपास दोन महिने पॅसिफिक महासागरातील लाटांचा मारा सहन केल्यानंतर मेक्सिकन ट्युना ट्रॉलरनं ऑस्ट्रेलियाचे नाविक आणि त्यांच्या श्वानाची सुटका केली. 

हेसुद्धा वाचा : भगवद् गीता अन् अणुबॉम्ब...1200 रुपये तिकीट; 'आता मी मृत्यू आहे' म्हणणारे Oppenheimer आहेत तरी कोण?

 

शेडॉक यांचा शोध लागला तेव्हा त्यांची दाढी वाढली होती. त्यांचं वजन कमी झाल्याचं पाहताक्षणी लक्षा येत होतं. असं असतानाही आपल्याला अजिबातच अशक्तपणा वाटत नसल्याचं ते म्हणाले. 'मी समुद्रात बऱ्याच आव्हानात्मक प्रसंगांना तोंड दिलं आहे. आता मला फक्त आकामाची आणि चांगल्या जेवणाची आवश्यकता आहे' असं म्हणताना आपण इतका काळ एकट्यानं व्यतीत केल्याची बाब त्यांनी सातत्यानं प्रकाशात आणली.