मियाँ – बीवी राजी तो क्या करेगा काझी... अजब लग्नाची गजब गोष्ट.. पाहा Video

प्रेमापुढे सर्वकाही फिकं... 28 वर्षांचा नवरदेव, 83 वर्षांची नवरी! दोघांची Love Story म्हणजे...   

Updated: Nov 6, 2022, 10:11 AM IST
मियाँ – बीवी राजी तो क्या करेगा काझी... अजब लग्नाची गजब गोष्ट.. पाहा Video  title=

Love is Everything : प्रेम म्हणजे फक्त एक भावना... प्रेम म्हणजे त्याग... प्रेम म्हणजे काळजी... (love story) आजपर्यंत तुम्ही अनेकांच्या लव्हस्टोरीबद्दल ऐकलं असेल. पण आता अशा एक जोडप्याची प्रेम कथा समोर आली आहे. ज्यामध्ये दोघांनी वयाला महत्त्व न देता फक्त एकमेकांवर असलेल्या प्रेमाला महत्त्व दिलं आहे. आता ज्या कपलची चर्चा रंगत आहे, ते कपल पाकिस्तानमधील (love story in pakistan) आहे.. दोघं देखील त्यांच्या वयामुळे चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (cute love story)

परदेशातून महिला लग्नासाठी पाकिस्तानमध्ये
83 वर्षीय ज्येष्ठ महिला ब्रोमा पोलंडमधील आहे (83 years old lady ). परदेशात राहणारी ही वृद्ध महिला 28 वर्षीय प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पाकिस्तानात आली. गेल्यावर्षी 1 नोव्हेंबर रोजी दोघांचे लग्न काझीपूर, हाफजाबाद येथे झालं. यंदाच्या वर्षी दोघे लग्नाला एक वर्ष झाल्यामुळे आनंद साजरा करताना दिसले. 

दरम्यान, लग्नाला एक वर्ष झालं आणि एकमेकांशी लग्न करून दोघेही खूप आनंदी आहेत... असं दोघांनी एक मुलाखतीत सांगितलं. पाकिस्तानी मुलगा आणि पोलंडमधील ज्येष्ठ महिला यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. 

सोशल मीडियामुळे 
कालांतराने त्यांच्या मैत्रीचं  (friendship)  रुपांतर प्रेमात (relationshil) झालं आणि दोघांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता लग्न करण्याचा विचातर केला. 83 वर्षीय वृद्ध महिलेचा पती हाफिज नदीम हा पाकिस्तानातील काझीपूर येथील रहिवासी असून तो ऑटो मेकॅनिक आहे. (social media)

83 वर्षीय वृद्ध महिलेसोबत लग्न करून हाफिज नदीम स्वतःला भाग्यशाली समजतो. कारण महिलेने त्याच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला एवढंच नाहीतर लग्नात पारंपरिक कपडे (tradition) देखील घातले. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत.