ब्रिटनमध्ये आज मतदान

ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. मतदानाआधी जाहीर झालेल्या अंदाजांमध्ये थेरेसा मे यांच्या कॉन्झर्वेटीव पक्षाला पसंती मिळालीय.  

Updated: Jun 8, 2017, 10:39 AM IST
ब्रिटनमध्ये आज मतदान title=

लंडन : ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. मतदानाआधी जाहीर झालेल्या अंदाजांमध्ये थेरेसा मे यांच्या कॉन्झर्वेटीव पक्षाला पसंती मिळालीय.  

विशेष या निवडणुकांमध्ये तब्बल 56 भारतीय उमेदवार रिंगणात आहेत. 2015 साली ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये 10 भारतीय खासदार निवडून आले होते. आता दोन वर्षांनी ब्रिटनमध्ये मध्यावधी निवडणुका होतायत. ब्रेक्झिटमध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी इंग्लंडच्या जनतेनं कौल दिला होता. 

ब्रेक्झिटच्या अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय घेता यावेत, यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. आता आज झालेल्या या मतदानानंतर इंग्लंडची जनता कुणाला कौल देते, याकडे लक्ष लागलंय.