प्लास्टिक बाटल्यांच्या मोबदल्यात बस तिकीट

बस तिकीटाला पैसे नसतील तर टेन्शन नाही. तुमच्या जवळ रिकाम्या पाच प्लास्टिकच्या बाटल्या असल्या तरी पुरे.

Updated: Aug 17, 2019, 12:32 PM IST
प्लास्टिक बाटल्यांच्या मोबदल्यात बस तिकीट title=

जकार्ता : प्लास्टिक मुक्तीसाठी एक धाडसी पाऊल उचलण्यात आले आहे. प्लास्टिक बाटल्यांच्या मोबदल्यात बस तिकीट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. इंडोनेशियाच्या सुरबाया शहरात हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्लास्टिकमुक्तीसाठीच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. इंडोनेशिया देशातल्या सुरबाया शहरात तुम्हाला बसने प्रवास करायचा असेल आणि तुमच्याजवळ तिकीटाला पैसे नसतील तर टेन्शन नाही. तुमच्या जवळ रिकाम्या पाच प्लास्टिकच्या बाटल्या असल्या तरी पुरे आहे. 

कारण या बसमधला कंडक्टरला तुम्ही पाच बाटल्या देऊन तिकीट घेऊ शकता. प्लास्टिकचे दहा कपही तिकीटासाठी पुरेसे असतात. सुरबाया शहर कचरामुक्तीसाठी प्रयत्न करतंय. त्याचाच एक भाग म्हणून शहरात या अभिनव पद्धतीनं दररोज जवळपास अडिचशे किलो प्लास्टिक कचरा गोळा गेला जातोय. तर आठवड्याला जवळपास सोळा हजार प्लास्टिक बाटल्या गोळा होतात.

इंडोनेशियात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही इंडोनेशियन जनतेत प्लास्टिकमुक्तीची मोहीम सुरू केली आहे. शहरातल्या नागरिकांनीही या उपक्रमाचं स्वागत केले आहे. नागरिकांचाही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

घरात प्लास्टिक बाटल्यांचा कचरा होतो. इथं तर घरात कचरा म्हणून पडलेल्या बाटल्यांचा बसचं तिकीट घेण्यासाठी वापर होतो. हे म्हणजे सगळ्याच बाजूने मस्त आहे प्लास्टिक ही जागतिक समस्या बनली आहे. सुरबाया शहरासारखे जगातल्या प्रत्येक शहरात अशी अनोखी मोहीम राबवल्यास एक दिवस जग नक्कीच प्लास्टिकमुक्त होईल, यात शंका नाही.