भारताने लोकसंख्येत मागे टाकल्याने चीनचा तिळपापड; म्हणाले "नुसती Quantity नाही, Quality पण..."

India Overtakes China in Polulation: भारताने लोकसंख्येत चीनला (China) मागे टाकलं असून सर्वाधिक लोकसंख्या (Population) असणारा देश ठरला आहे. दरम्यान, भारताने मागे टाकल्यानंतर चीनची मात्र चिडचिड होताना दिसत आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यानी यांनी यावर भाष्य करताना टीका केली आहे.  

शिवराज यादव | Updated: Apr 21, 2023, 11:50 AM IST
भारताने लोकसंख्येत मागे टाकल्याने चीनचा तिळपापड; म्हणाले "नुसती Quantity नाही, Quality पण..." title=

India Overtakes China Become Most Polulous Nation: भारताने लोकसंख्येत (Population) चीनला मागे टाकलं आहे. बुधवारी संयुक्त राष्ट्राने (United Nations) यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून भारताची लोकसंख्या 142.86 कोटी इतकी झाली आहे. तर चीनची (China) लोकसंख्या 142.57 कोटी इतकी आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राने पुढील तीन दशकं भारताची लोकसंख्या वाढत राहील असा अंदाज वर्तवला आहे. मात्र लोकसंख्येत भारताने मागे टाकल्याने चीनची मात्र चिडचिड होताना दिसत आहे. भारताची लोकसंख्या वाढणं ही फार मोठी कामगिरी नसल्याचं चीनचं म्हणणं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे भारताच्या लोकसंख्येबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी टीका केली आहे. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताचा उल्लेख न करता फक्त लोकसंख्या वाढली म्हणून फायदा होत नाही असा टोला लगावला आहे. फक्त लोकसंख्या वाढून फायदा नाही, दर्जाही असला पाहिजे असं चीनने म्हटलं आहे. आपल्या देशाकडे सध्या 90 कोटी कार्यक्षम लोक असून ते चिनी अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे नेत आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता वेंग वेनबिन यांनी म्हटलं आहे की "मला तुम्हाला सांगायचं आहे की, लोकसंख्येचा फायदा हा आकडेवारीवर नाही तर दर्जावर अवलंबून असतो. लोकसंख्या महत्त्वाची आहे, पण त्यासोबत प्रतिभाही असली पाहिजे". चीनची लोकसंख्या 142 कोटीहून अधिक आहे. काम करणाऱ्या लोकांची संख्या 90 कोटींहून अधिक आहे. याशिवाय चीन सध्या वय होणाऱ्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करत आहे. 

लोकसंख्येकडून होणाला लाभांश अद्याप संपलेला नाही आणि आमची प्रतिभाही वाढत आहे. विकासासाठी हे प्रेरणादायक ठरत आहे असंही वेंग वेनबिन म्हणाले आहेत. 

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश राहिल्याने चीनने अनेक वर्षं लोकसंख्येचा फायदा घेतला आहे. त्यांनी कमी किंमतीत चांगली आणि दर्जात्मक कामगार मिळाले. चीनला कधीही कामगार, हायटेक कामगार, डॉक्टर, इंजिनिअर यांची कमतरता भासली नाही. पण वाढता जीवनदर, वयस्कर होणारी लोकसंख्या, अनेक वर्षं राबवण्यात आलेली एक अपत्य योजना यामुळे चीनची लोकसंख्या बराच काळ स्थिर राहिली होती. मात्र आता लोकसंख्या वेगाने कमी होत आहे. यामुळे चीनला लोकसंख्येकडून होणारा फायदा कमी होण्याची भीती सतावत आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, भारतातील मीडियन एज 29 वर्षं आहे. म्हणजेच जवळपास अर्धी लोकसंख्या 29 पेक्षा कमी वयाची आहे. भारतातील 68 टक्के लोक 15 ते 64 वयोगटातील आहेत. याच वयोगटाला कार्यक्षम म्हणून ओळखलं जातं. चीममध्ये मात्र याउलट स्थिती आहे. चीनमधील मीडियन एज 39 वर्षं आहे. 2050 पर्यंत चीनमधील मीडियन एज 51 असेल. यासह कामगारांसंबंधी चीनमध्ये समस्या उद्भवण्यास सुरुवात होईल.