चीनमध्ये मुस्लिमांना कुराण जमा करण्याचे आदेश

चीनी अधिकाऱ्यांनी देशातील मुस्लिमांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. स्थानिक मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नमाजाची चटई आणि कुराण पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत... आदेश न मानल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागू शकते. 

Updated: Sep 30, 2017, 05:12 PM IST
चीनमध्ये मुस्लिमांना कुराण जमा करण्याचे आदेश title=

बिजिंग : चीनी अधिकाऱ्यांनी देशातील मुस्लिमांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. स्थानिक मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नमाजाची चटई आणि कुराण पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत... आदेश न मानल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागू शकते. 

'टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, कट्टरतावादाला प्रोत्साहन देण्यारा मजकूर कुराणमध्ये असल्याचं चीनी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. चीनच्या शिन्जियांग प्रांतातील अधिकाऱ्यांनी उईगुर समुदायाला आपल्या धार्मिक गोष्टी जमा करण्याचे आदेश दिलेत. 

परंतु, चीनी परदेश मंत्रालयानं मात्र अशा प्रकारचे कुठलेही आदेश दिले नसल्याचं म्हटलंय. या बातम्या तथ्यहीन असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.