China Ice Burial technology:चीनमध्ये हॉलिवूड चित्रपटाच्या स्टाईलने कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट, वाचा धक्कादायक खुलासा

चीनमधीन वुहानमध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानाहेर रांगा लागत आहेत. त्यामुळेच आता चीनने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी IceBurial technology ची मदत घेतली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्याने हा खुलासा केला आहे.  

Updated: Jan 21, 2023, 11:48 AM IST
China Ice Burial technology:चीनमध्ये हॉलिवूड चित्रपटाच्या स्टाईलने कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट, वाचा धक्कादायक खुलासा title=
Photo: The Shandong Yinfeng Life Science Research Institute

IceBurial Technology amid rising number of Covid deaths:  चीनमध्ये कोरोनाने (Covid in China) पुन्हा एकदा थैमान घातलं असल्याने भयानक स्थिती आहे. चीनमधीन वुहानमध्ये (Wuhan) कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानाहेर रांगा लागत आहेत. त्यामुळेच आता चीनने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी हॉलिवूडमधील एका चित्रपटाची मदत घेतली आहे. मानवाधिकार कार्यकर्ता जेनिफर जेंग (Jennifer Zeng) यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. 90 च्या दशकात आलेल्या या 'डिमोलिशन मॅन' चित्रपटापासून प्रेरित होत चीन नायट्रोजनच्या सहाय्याने मृतदेहांची विल्हेवाट लावत आहे. या चित्रपटात सिल्व्हेस्टर स्टॅलॉन (Sylvester Stallone), वैस्ली स्नाइप्स आणि सैंड्रा बुलक्स मुख्य भूमिकेत होते. 

चीनमध्ये करोनाची अत्यंत वाईट स्थिती आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानेही आता करोनाच्या नव्या रुग्णांची माहिती देणार नसल्याचं सांगितलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य यंत्रणा प्रत्येक दिवसाच्या करोना रुग्णांची माहिती देत होती. यादरम्यान जेनिफर जेंग यांनी चीनमध्ये करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत नवा खुलासा केला असून कशाप्रकारे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जात आहेत हे उघड केलं आहे. 

कशाप्रकारे मृतदेहांची विल्हेवाट लावली जात आहे?

सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पार्टीसंबंधी गोष्टी उघड करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्ता जेनिफर जेंग यांनी याचा खुलासा केला आहे. जेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि रोज होणारे मृत्यू लक्षात घेता सरकारने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नवी पद्धत अवलंबली आहे. वुहान शहरात ही नवी पद्धत अवलंबली जात असून मृतदेहांना द्रव नायट्रोजनमध्ये उणे 196 डिग्री तापमानात गोठवलं जातं. यानंतर त्यांचं रुपांतर पावडरमध्ये केलं जातं. पारंपारिक अंत्यसंस्काराच्या तुलनेत ही प्रक्रिया फार वेगाने होते. 

याआधीही या तंत्रज्ञानाचा झाला आहे वापर

अंत्यसंस्कारासाठी IceBurial technology चा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्ये एक स्वीडिश आणि आयरिश कंपनी अंत्यसंस्कारासाठी नवे पर्याय शोधण्यावर काम करत होती. त्याचवेळी हा नवा पर्याय शोधण्यात आला होता. 

अंत्यसंस्कारासाठी संबंधित या वादग्रस्त प्रक्रियेत मृतदेह गोठवल्यानंतर त्याची राख करण्यासाठी द्रव नायट्रोजनचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाला सुरुवातीला प्रॉमिशन असं नाव देण्यात आलं होतं. 

न्यूयॉर्क पोस्टनुसार, प्रॉमिशनच्या सहाय्याने मृतदेह एका कस्टमाईज मशीनमध्ये टाकत असत. मग मशीन आपोआप शवपेटीचे झाकण काढून मृतदेहाच्या आतील पाण्याची वाफ करते. त्यानंतर द्रव नायट्रोजनच्या मदतीने मृतदेह गोठवून त्याची पावडर बनवली जाते.