गेम झाला! स्वत:च्याच सापळ्यात फसली चिनी पाणबुडी, Yellow Sea मध्ये 55 सैनिकांना जसलमाधी

Chinese Submarine News: भारत आणि चीनच्या नात्यामध्ये असणारं तणावाचं वातावरण कमी होत नाही ही वस्तुस्थिती. पण, चीनच्या खुरापतीसुद्धा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.   

सायली पाटील | Updated: Oct 4, 2023, 10:38 AM IST
गेम झाला! स्वत:च्याच सापळ्यात फसली चिनी पाणबुडी, Yellow Sea मध्ये 55 सैनिकांना जसलमाधी  title=
Chinese Nuclear Submarine aimed To Trap British Vessels Sinks In Yellow Sea 55 Sailors Feared Dead

Chinese Submarine News: भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावात दिवसागणिक भर पडताना दिसत आहे. पण, सध्या मात्र कोणा दुसऱ्या देशासाठी डाव रचणारं चीन स्वत:च रचलेल्या सापळ्यात अडकून पडताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार चीनची अण्विक पाणबुडीचा भीषण अपघात झाला असून,  Yellow Sea मध्ये या पाणबुडीला जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा सागरी अपघात इतका भीषण होता की यामध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात चीनच्या सैन्याच्या 55 जवानांनाही जलसमाधी मिळाल्याचं म्हटलं जात आहे. 

'डेली मेल'नं याबाबतची माहिती दिली.  Yellow Sea मध्ये ही पाणबुडी ब्रिटीश जहाजांना सापळा रचून लक्ष्य करण्यासाठी पाठवण्यात आली होती. चीनच्या सैन्याकडूनच यासाठी एक सापळा रचण्यात आला होता. पण, स्वत:च्याच सापळ्यात चीन फसलं आणि हा घात झाला. यापूर्वीही अशीच एक दुर्घटना घडली होती. पण, चीनकडून मात्र यापैकी कोणत्याही दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नाही. 

पाणबुडीचं नेमकं झालं काय? 

युनायडेट किंग्डमच्या गुप्तचर यंत्रणांकडून समोर आलेल्या माहितीनुसार या पाणबुडीचा अंत त्यातील ऑक्सिजन यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळं झाला. पाहता पाहता पाणबुडीत असणारा क्रू गुदमरला आणि अंतर्गत भागात झालेल्या विषप्रयोगामुळं त्यांचा अंत ओढावला अशी शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातामध्ये  '093-417' पाणबुडीच्या कॅप्टनसह 21 अधिकाऱ्यांचा मृत्यू ओढावल्याचं सांगण्यात येत आहे. सध्याच्या घडीला चीननं यातील कोणत्याही वृत्ताला दुजोरा दिला नसून, त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची विचारणा केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Sikkim Floods Video : सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर नद्यांना रौद्र रुप; लष्कराचे 23 जवान बेपत्ता 

नेमकी कधी घडली घटना? 

युकेकडून जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार 21 ऑगस्ट रोजीच ही घटना घडली. जिथं Yellow Sea मध्ये एका मोहिमेसाठी लष्कराच्या सेवेत असतानाच चीनच्या पाणबुडीला अपघात झाला. रात्री 8 वाजून 12 मिनिटांनी हा अपघात झाला. ज्यामध्ये 55 नौदल सैनिकांचा मृत्यू ओढावला. यात 20 हून अधिक बड्या अधिकारी, सात कॅडेट, 9 कनिष्ट श्रेणी अधिकारी आणि 17 नाविकांचा दुर्दैवी अंत झाल्याचं म्हटलं हेलं. समुद्रातून पुढं जाताना या पाणबुड्यांचा आवाज इतका कमी असतो की, शत्रूलाही त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळं लक्ष्यभेद करणं चीनसाठी आणखी सोयीचं ठरतं. पण, इथं मात्र चीन स्वत:च रचलेल्या सापळ्यात फसलं हेच स्पष्ट होत आहे.