Corona In china : ​चीनमध्ये 5 आठवड्यात 9 लाख मृत्यू? अजूनही कोरोना मृतांचा आकडा लपवतोय चीन?

आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेरीस चीननं एक नावापुरती का होईना एक आकडेवारी जाहीर केलीय. चीन सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Updated: Jan 17, 2023, 09:10 PM IST
Corona In china : ​चीनमध्ये 5 आठवड्यात 9 लाख मृत्यू? अजूनही कोरोना मृतांचा आकडा लपवतोय चीन? title=

Corona In china : आयसीयूत जागा नाही...हॉस्पिटल्स फुल्ल...शवागृहात वेटींग...जागोजागी मृतदेहांचा खच...ही महाभयानक स्थिती आहे चीनमधली (china). तरी चीन जगापासून खरी आकडेवारी लपवत होता. नोव्हेंबर आणि डिसेंबर या कोरोना कहर काळात चीन सरकारने (Government of china) अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेरीस चीननं एक नावापुरती का होईना एक आकडेवारी जाहीर केलीय. चीन सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

अर्थात हा चीन सरकारने केलेला दावा आहे. पण अमेरिकेच्या कॅलिफोर्निया आणि चीनच्या पेकिंग विद्यापीठाने चीनची पोलखोल केलीय. या विद्यापीठांच्या अहवालानुसार.

पेकिंग विद्यापीठाचा अहवाल काय? 

  • चीनमध्ये कोरोनामुळे दररोज 4 ते 5 हजार मृत्यू होतायात
  • 50 लाख कोरोना रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत
  • बीजिंग शहरातील 80 % लोकसंख्या कोरोनाबाधित झालीय
  • शांघाय शहरातील 50 % लोकसंख्या कोरोनाग्रस्त झालीय
  • जानेवारीच्या मध्यापर्यंत चीनची 64% लोकसंख्या कोरोना संक्रमित झालीय
  • घरात झालेल्या मृत्यूंची चीन सरकारने नोंद केलेली नाही

चीनमध्ये 21 जानेवारीपासून, लुनार नवीन वर्षाच्या सुट्ट्या सुरु होतायत. पण चीनमध्ये कोरोना अनियंत्रित झालाय. कोरोनाचा वेग असाच राहिला तर चीनमध्ये 2023 च्या अंतापर्यंत 12 ते 16 लाख मृत्यू होऊ शकतात. कोरोनामुळे दाणादाण उडालेली असतानाही चीन ना खरी परिस्थिती लोकांसमोर आणतोय ना जगाकडून काही मदत घेतोय..  

2020 मध्ये चीनच्या वुहान लॅबमधून पहिल्यांदा जगभरात कोरोनाचा प्रसार झाला होता आणि आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा स्फोट झालाय. कोरोनाच्या झटक्यातून जग आता कुठे सावरत असताना पुन्हा चीननं जगाचं टेन्शन वाढवलंय.