कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, 5 वर्षांपर्यंत मुलांसाठी या देशात लसीकरण

Corona Vaccination for Children: कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आता 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लसीकरण सुरु होणार आहे. लसीकरण संदर्भात अमेरिकेत 2 कंपन्या लवकरच सरकारसोबत बैठक घेणार आहेत.

Updated: Jun 3, 2022, 08:18 AM IST
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, 5 वर्षांपर्यंत मुलांसाठी या देशात लसीकरण title=

वॉशिंग्टन : Corona Vaccination for Children Under 5 Years : जगात पुन्हा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चिंता करण्यात येत आहे. आता लहान मुलांसाठी कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. 5 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाची जोरदार तयारी  सुरु आहे. 21 जूनपासून अमेरिकेत लसीकरण सुरु होऊ शकते.

5 वर्षांखालील मुलांसाठी कोरोना लसीकरण 

गेल्या 2 वर्षांपासून जगासाठी डोकेदुखी ठरलेली कोरोना महामारी अजूनही संपण्याचे नाव घेत नाही आहे. या साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व देश त्यांच्या जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याच्या धोरणावर काम करत आहेत. आता अमेरिकेत 5 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण करण्याची योजना आखली जात आहे.

14-15 जून रोजी एफडीएची बैठक होणार  

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे समन्वयक आशिष झा यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासनाच्या सल्लागार समितीने 14-15 जून रोजी लहान मुलांसाठी फायझर आणि मॉडर्नाच्या डोसला मान्यता दिली. एफडीएकडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच रुग्णालये आणि बालरोग उपचार केंद्रांमध्ये लसीचा पुरवठा सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

आशिष झा म्हणाले की, फेडरल एफडीएने या दोन औषधांना अपेक्षेप्रमाणे मान्यता दिल्यास 21 जूनपासून बालकांचे लसीकरण सुरू होईल. याअंतर्गत 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी लस दिली जाईल. जगात अशा लहान मुलांसाठी अद्याप कोणतीही लस तयार केलेली नाही. अशा स्थितीत या बालकांचे लसीकरण अमेरिकेत सुरु झाले, तर उर्वरित जगात त्याचा परिणाम होईल.

जगात कोरोनाच्या तीन लाटा

आतापर्यंत जगात कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या आहेत. या तिन्ही लाटांमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. वयोवृद्ध लोकांसाठी, कोरोना लसीकरणाचे काम जगभरात वेगाने सुरु आहे, परंतु आजपर्यंत 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अशी कोणतीही लस तयार केलेली नाही. त्यामुळेच जगभरात चिंतेचे वातावरण आहे की, जर कोरोनाची चौथी लाट आली तर लसीकरणाशिवाय 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना त्याचा बळी जाऊ शकतो.