ऑनलाइन क्लासमध्ये अशा प्रकारे मोबाईल वापरल्याने स्फोट, 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

तुमच्या घरात जर मुलं असतील ते ऑनलाइन क्लास करत असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 

Updated: Oct 20, 2021, 05:53 PM IST
ऑनलाइन क्लासमध्ये अशा प्रकारे मोबाईल वापरल्याने स्फोट, 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू title=

हनोई: कोरोनामुळे अजूनही अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मोबाईल स्फोटाच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. आता ऑनलाइन क्लास सुरू असताना मोबाईलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. 

तुमच्या घरात जर मुलं असतील ते ऑनलाइन क्लास करत असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणाची पद्धतही बदलली आहे. ऑनलाइन शिक्षणसाठी लॅपटॉप प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे स्मार्टफोन हेच साधन ठरलं आहे. मात्र या ऑनलाइन शिक्षणाचे तोटेही मुलांना होत आहेत. आता चक्क मोबाईलच मुलांसाठी धोकादायक होतो का अशी भीती निर्माण होत आहे. 

व्हिएतनाममध्ये एका ऑनलाईन क्लास करणाऱ्या मुलाच्या मोबाईलमध्ये स्फोट झाला. 11 वर्षांचा मुलगा मोबाईल चार्जिंग लावून ऑनलाइन क्लास करत होता. त्याने इयरफोनही घातले होते. याच वेळी अचानक मोबाईलचा स्फोट झाला. मोबाईलला आग स्फोटानंतर आग लागली. या घटनेमध्ये मुलगा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 

रुग्णालयात पोहोचण्याआधीच सोडला प्राण

द सनने दिलेल्या वृत्तानुसार कोरोनाच्या निर्बंधामुळे ऑनलाईन क्लास सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर अचानक चार्जिंग दरम्यान मोबाईलचा स्फोट झाला आणि त्याच्या कपड्यांना आग लागली. शेजाऱ्यांनीही मुलाला तातडीने रुग्णालयात नेले. पण त्याचा रुग्णालयात उपचाराआधीच मृत्यू झाला. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली.