काय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral

इझीजेटच्या फ्लाइटमधल्या टॉयलेटमध्ये लैंगिक कृत्य करताना पकडलेल्या जोडप्याला पोलिसांना विमानातून बाहेर काढावे लागले. केबिन क्रूने विमान हवेत असतानाच हा प्रकार उघडकीस आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Sep 14, 2023, 11:57 AM IST
काय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral title=

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये (Flight Viral Video) गैरप्रकार होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कधी विमानातील कर्मचाऱ्यांसोबत तर कधी प्रवाशांसोबत गैरवर्तणूक होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच आता विमानातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इझीजेट फ्लाइटमध्ये (EasyJet Flight) बसलेले एक जोडपे टॉयलेटमध्ये सेक्स करताना पकडले गेले आहे. या जोडप्याचा टॉयलेटमध्ये सेक्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रिटनच्या ल्युटन ते इबीझा या इझीजेटच्या फ्लाइट दरम्यान टॉयलेटमध्ये सेक्स करताना एक जोडपं कथितपणे कॅमेऱ्यात पकडले गेले आहे. एक्स या सोशल मीडिया अकाऊंवर व्हायरल झालेला हा धक्कादायक व्हिडीओ 8 सप्टेंबर रोजी असल्याचा म्हटलं जात आहे. व्हिडीओमध्ये एका फ्लाइट अटेंडंटने टॉयलेटचा दरवाजा उघडताच हे जोडपे सेक्स करताना पकडले गेले होते. फ्लाइटमधील सगळ्या प्रवाशांनीही या जोडप्याला टॉयलेटमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.

इझीजेटचे फ्लाइट ल्युटनहून इबीझाला जात होते त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. स्टाफ मेंबरने टॉयलेटचा दरवाजा उघडताच हे जोडप्याचा प्रताप फ्लाइटमधील इतर प्रवाशांसमोर आला. या जोडप्याला आक्षेपार्ह स्थितीत पाहून विमानातील प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या जोडप्याला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून कर्मचारी हसला आणि त्याने लगेचच दरवाजा बंद केला.

जोडप्याचा प्रताप समोर आल्यानंतर फ्लाइटमध्ये असलेले प्रवासी उलट त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. केबिन क्रू आणि काही प्रवाशांनी त्यावेळी टाळ्या देखील वाजवल्या. व्हिडिओमध्ये एक महिला प्रवासी 'ओह माय गॉड' असेही ओरडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला दुसऱ्या प्रवाशाला ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली की नाही हे विचारतानाही ऐकू येत होते. विमान इबीझामध्ये उतरल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला विमानातून बाहेर काढले.

इझीजेटने त्यांच्या एका विमानामध्ये ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनाही दिली होती. "आम्ही याची पुष्टी करतो की 8 सप्टेंबर रोजी ल्युटन ते इबीझा या फ्लाइटदरम्यान दोन प्रवाशांच्या वर्तनामुळे पोलिसांना बोलवावं लागलं होते," असे इझीजेट एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, विमानात लैंगिक संबंधांबाबत कारवाई करणारा ब्रिटनचा कोणताही कायदा नसला तरी, लैंगिक अपराध कायदा 2004 च्या कलम 71 अंतर्गत सार्वजनिक शौचालयात जाणूनबुजून लैंगिक क्रिया करणे' हा गुन्हा आहे.