VIDEO : यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर इथे येऊन जेवा! 295 फूट उंचीवर कपलची रोमँटिक डेट

Viral Video : हिल स्टेशन, एखाद्या नदीकिनारी किंवा उंच हॉटेलच्या टेरेसवर कपल आपली रोमँटिक डेट साजरी करत असतात. पण तुम्हाला यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन जेवून दाखवा. 

नेहा चौधरी | Updated: Aug 29, 2023, 10:54 AM IST
VIDEO : यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर इथे येऊन जेवा! 295 फूट उंचीवर कपलची रोमँटिक डेट title=
couple romantic date table dangling 295 feet over waterfall shocking video viral watch now Trending news

Viral Video : जगाच्या पाठीवर असे अनेक ठिकाण आहेत. जिथे कपल रोमँटिक डेटसाठी जातात. हिल स्टेशन, नदीकिनारी, एखाद्या सुंदर बीचवर कपल रोमान्स करण्यासाठी जातात असतात. सोशल मीडियावर एका कपलचा रोमँटिक डेटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते उंच अशा धबधब्याच्या शेजारी खोल नदीच्या वरीत एका डबलवर जेवताना दिसत आहेत. (couple romantic date table dangling 295 feet over waterfall shocking video viral watch now Trending news)

हो जगात असाशी जागा आहेत, जिथे जायला कोणालाही भीती वाटेल. त्यापैकी ही एक जागा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. हा साहसी खेळ आहे की, यमराजाला निमंत्रण हे तुमच ठरवा. खरं तर हे एक हॉटेल आहे, जिथे कपल रोमँटिक डेटसाठी जातात. या तरंगत्या हॉटेलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना शॉक बसला आहे. 

295 फूट उंचावरील हॉटेल 

ख्रिस्तियाना हर्ट आणि तिच्या प्रियकराने रॅपने धबधब्याच्या बाजूला असलेल्या नदीवर जेवण्याचा बेत आखला. हवेत 295 फूट उंचीवर असलेल्या टेबलावर हे दोघे जेवण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. खाली खोल वाहती नदी म्हणजे एक चूक आणि यमराजाला आमंत्रण. रेड वाइनचा ग्लास आणि जेवणाचा मनमुराद आनंद उचलताना हे दोघे दिसत आहेत. 

37 हजार रुपयांसाठी यमराजाला निमंत्रण?

पण तुम्ही हा व्हिडीओ पाहून हा मुर्खपणा आहे असंच म्हणाल. या व्हिडीने हृदयाचे ठोके चुकतात. जरी तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहत असाल केबल्स आणि वायरच्या मदतीने बांधलेले दिसत असेल तरी हा एक भयानक जीवघेणा खेळ आहे. या ठिकाणी रोमँटिक डेटचा आनंद घेण्यासाठी 15 मिनिटांसाठी 50 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 37 हजार रुपयांपेक्षा थोडे अधिक खर्च मोजावे लागतात. 

हेसुद्धा वाचा - VIDEO : बॅचलर पार्टी लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर विचित्र कृत्य, वधूने काय केलं पाहा

जर तुमचं हृदय मजबूत असेल आणि साहसी खेळाची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. हे ठिकाण आहे ब्राझीलमध्ये आहे. तर या व्हिडीओमधील कपल अमेरिकेतील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर christiannahurt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.