हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, 'मौत को टच करके आया'

मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला थरकाप उडवणारा व्हिडिओ

Updated: Feb 1, 2022, 08:46 PM IST
हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, 'मौत को टच करके आया' title=

Deadly Viral Video: गिर्यारोहण म्हणजे साहस, हिम्मत आणि जिद्दीचा प्रकार. गिर्यारोहक जेव्हा गिर्यारोहणासाठी निघतो तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गिर्यारोहकाला शेकडो आव्हानं स्विकारत पुढे जात रहावं लागतं, अनेक वेळा तर मृत्यूलाही सामोरे जावं लागतं. खबरदारी बाळगली नाही तर अनेकवेळा गिर्यारोहकांचा मृत्यू ओढावल्याच्या बातम्या आपण वाचत, ऐकत असतो. 

असाच काहीसा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वेळ आली होती, पण काळ आला नव्हता असंच हा व्हिडिओ पाहून म्हणावं लागेल. अगदी काही क्षणांनी त्या गिर्यारोहकाने मृत्यूला चकवा दिला.

वेळ आली होती पण...
मृत्यू समोर दिसत असला की लोक जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. आयुष्य किती क्षणभंगुर आहे हे अशा घटना शिकवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला 'फ्लाइंग किस ऑफ डेथ' (Flying kiss of Death) असं म्हटलं जात आहे.

7 हजार फुट उंच पर्वतावर गिर्यारोहण
हा व्हिडिओ itshimalayas इंस्टाग्राम पेजवर (Instagram Page) शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये काही गिर्यारोहक पाकिस्तानातील (Pakistan) स्पॅंटिकमधील  (Spantik) 7,000 फूट उंच पर्वतावर चढाई करत होते. एका महाकाय खडकाखाली तंबू टाकून यातील काही जण विश्रांती घेत होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Itshimalayas (@itshimalayas)

पण त्याचवेळी अचानाक मोठ मोठे खडक उंचावरुन खाली पडू लागले. एक मोठा खडक एका गिर्यारोहकाच्या अगदी जवळून जात असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मृत्यू अगदी त्याच्या जवळून जाताना दिसतोय, पण क्षणाचाही विलंब न लावता त्या गिर्यारोहकाने आपला जीव वाचवला. त्या गिर्यारोहकाने दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक होत आहे.