पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ

पृथ्वीच्या शेजारीच एलियन आहेत. 2030 पर्यंत NASA एलियनशी संपर्क साधणार आहे. संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 30, 2024, 10:56 PM IST
पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ title=

Aliens News : एलियन्स असल्याचा दावा अनेकदा केला जातो.  एलियनच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस पुरावे देण्यात आलेले नाहीत. अशातच आता एलियन पृथ्वीच्या शेजारीच असल्याचा दावा करण्यात आला आहे. 2030 पर्यंत NASA एलियनशी संपर्क साधणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. संशोधकांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

गुरु ग्रहाचा चंद्र युरोपावर एलियन असल्याचा दावा

एलियन खरोखर अस्तित्वात आहेत का? एलियन्स असतील तर कुठे राहतात? जगभरातील संशोधक या दोन प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. वैज्ञानिकांच्या संशोधनाला मोठे यश आले आहे. गुरु ग्रहाचा चंद्र युरोपावर एलियन असू शकतात अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. युरोपावर असलेल्या एलियनशी संपर्क साधण्यासाठी NASA ने विशेष मोहिम हाती घेतली आहे.  2030 पर्यंत NASA एलियनशी संपर्क साधणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

NASA कशा प्रकारे साधणार एलियनशी संपर्क?

ऑक्टोबर 2024 मध्ये NASA 'युरोपा क्लिपर' नावाचे अंतराळयान अवकाशात पाठवणार आहे. तब्बल साडे पाच वर्षांचा प्रवास करुन नासाचे 'युरोपा क्लिपर' हे यान  गुरु ग्रहाचा चंद्र युरोपावर पोहचणार आहे.  ही मोहिम राबवण्यासाठी NASA ने 178 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1500 कोटी रुपये खर्च करणार आहे. 'युरोपा क्लिपर' यान गुरु ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का याचा शोध घेणार आहे. युरोपा क्लिपर स्पेसक्राफ्टवर अनेक पेलोड अर्थात उपकरणे असणार आहेत.   युरोपा चंद्रा मोठा समुद्र होता.  युरोपा चंद्राच्या महासागरांतून बाहेर पडणाऱ्या लहान बर्फाच्या कणांंचे परीक्षण करुन यातून जीवसृष्टीचे पुरावे शोधले जाणार आहेत. बर्फाखाली बॅक्टेरिया गाडलेले असावेत.  'युरोपा क्लिपर' यान या बॅक्टेरियाचे नमुन्यांचे परिक्षण करुन जीवसृष्टीचे पुरावे शोधणार आहे. या पूर्वी संशोधनादरम्यान गुरु ग्रहावर जीवसृष्टीच्या अस्तित्नाबाबत अनेक पुरावे सापडले आहेत.

अमरेकितल्या एका मॉलबाहेर एलियन दिसल्याचा दावा

अमेरिकेतल्या फ्लोराडातील मियामी शहरातील मॉलबाहेर एलियन दिसल्याचा दावा करण्यात आला होता. लोकांनी इथं 10 फूट उंचीचा एलियन पाहिला. लोक सैरावैरा धावत होते. यादरम्यान चेंगराचेंगरीही झाली. त्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय. या घटनेनंतर अमेरिकेतल्या सोशल मीडियात एलियन्सबाबतची चर्चा रंगलीय. खरंच या मॉलबाहेर एलियन दिसला का? अर्थात याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे मिळू शकलेले नाही. उलट चौकशीअंती एक वेगळंच सत्य समोर आलं. खरं तर या शॉपिंग मॉलबाहेर दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर लोक इथून पळू लागले. या मारामारीची बातमी माहिती मिळताच पोलिसांची फौज घटनास्थळी हजर झाली. दहशतीमुळे लोक इकडे तिकडे पळत होते. कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियात व्हायरल केला. त्यानंतर एलियन दिसल्यामुळे अनागोंदी माजल्याचा दावा करण्यात आला. मात्र चौकशीअंती इथे एलियन दिसला नसल्याचं स्पष्ट झालं. कुणीतरी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ व्हायरल केल्याचं समोर आलंय.