Viral News : कपड्याच्या मुलालाही देता येतो जन्म? महिलेचं कुटुंब पाहून बसेल धक्का

Extra Marital Affairs : नवरा बायकोमधील (Husband Wife Video) नातं खूप खास असतं. कधी कोणावर प्रेम होईल हे कोणी सांगू शकतं नाही. अशीच एक प्रेम कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Updated: Nov 20, 2022, 08:53 PM IST
Viral News : कपड्याच्या मुलालाही देता येतो जन्म? महिलेचं कुटुंब पाहून बसेल धक्का title=
Extra Marital Affairs Woman Married to Ragdoll Viral news nmp

Woman Married to Ragdoll : लहानपण आपण अनेकांनी बाहुला बाहुलीचं लग्न केलं असेल. त्यात एक वेळीच मजा असते. मुलींसाठी तिची पहिली बाहुली ही खूप खास असते. अगदी आपण रात्री झोपताना त्या बाहुलीला घेऊन झोपायचो. ती बाहुली आपली खास मैत्रिण असते तिला आपण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगतो. म्हणतात प्रेमात (Love)  वय, धर्म, रंग हे महत्त्वाचे नसतात. आजकाल तर समलैंगिक नातेही समोर आले आहेत. आपण एका मुलाचं मुलाशी आणि एका मुलीचं मुलीशी लग्न (marriage) पाहिलं आहे. पण या महिलेचं कुटुंब बघून तुम्हाला नक्कीच शॉक बसेल. 

अद्भुत प्रेमकथा

आईने एक कापड्याचं बाहुल बनवलं आणि मग काय मुलगी या बाहुल्या एवढ्या प्रेमात पडली की तिने चक्क त्याचासोबत लग्न थाटलं. एवढंच नाही तर तिच्या या संसारात एका मुलाचं आगमन झालं. हो मुलाचं आणि तोही कापड्याचं मुलं. आता या प्रेम कहाणीत ट्वीस्ट आलं आहे. नवऱ्यांचं दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचं दावा या महिलेने केला आहे. (Extra Marital Affairs Woman Married to Ragdoll Viral news nmp)

कुठली आहे घटना? 

मेरिव्होन रोचा मोरेसन असं या महिलचं नाव असून ती 37 वर्षांची आहे. तिने यावर्षी जून महिन्यात लग्न करण्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले. त्यानंतर आई झाल्याची बातमीही तिने सोशल मीडियावर दिली. मुलं झाल्यानंतर गुड्डा मोटेल याने तिची फसवणूक केलाचा दावा तिने केला आहे. दुसरा महिलेसाठी तो माझी फसवणूक करत असल्याचं महिला सांगते. 

मिरर रिपोर्टनुसार मेरिवोनने सांगितलं की, मुलाची बेबी रॅगची तब्येत खराब असताना ती हॉस्पिटलमध्ये होती. तेव्हा तिचा नवरा गुड्डा मोटेल दुसऱ्या महिलेसोबत होता, असं तिला तिच्या मैत्रिणीने सांगितलं. हा सगळ्या गंमतीशीर प्रकार सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होतो आहे. या घटनेनंतर महिला आणि कथित नवऱ्याचं खूप भांडण झालं. आता ते दोघे एकाच घरात पण वेगवेगळ्या खोलीत राहतात. मुलासाठी ते दोघे एकत्र आहेत. अजून गंमतीशीर भाग म्हणजे ही महिला नवऱ्याला परत एक संधी देण्याचा विचार करत आहेत.