काय सागंताय! माणूस आता 200 वर्षं जगणार?

आपण किमान शंभर वर्ष तरी जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र सगळ्यांनाच आयुष्याची सेंच्युरी गाठता येतेच असं नाही. 

Updated: Jul 6, 2022, 09:17 PM IST
काय सागंताय! माणूस आता 200 वर्षं जगणार? title=

मुंबई :  आपण किमान शंभर वर्ष तरी जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र सगळ्यांनाच आयुष्याची सेंच्युरी गाठता येतेच असं नाही. पण काळजी करू नका, तुमचं प्रदीर्घ काळ जगण्याचं स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाऊ शकते. तुम्ही 100 नव्हे तर तब्बल 200 वर्षं जगू शकता, ते कसं चला पाहूयात. (fact check now man will be able to live 200 years british biologist claims to make aging drug)

आपल्याला दीर्घायुष्य लाभावं असं प्रत्येकालाच वाटतं. तुमचं हेच स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं. तुम्ही शंभर-सव्वाशे नाही तर तब्बल 200 वर्षं जगू शकता. ब्रिटनमधील बायोलॉजिस्ट डॉक्टर अँड्र्यू स्टील यांनी हा दावा केलाय. इतकंच नाही तर माणसाला दीर्घायुषी बनवणारं औषधही तयार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ऍन्ड्रयू स्टील यांनी अलिकडेच यावर एक पुस्तकही लिहलंय. 

त्यांच्या दाव्यानुसार माणूस 200 वर्षांपर्यंत जगू शकतो. आपल्याजवळील औषधांचं सेवन केलं तर शरीरातील 'जॉम्बी' पेशी नष्ट होतात. 2020 मध्ये याबाबत लॅन्सेटमध्ये एक अहवालही प्रकाशित करण्यात आला. 

त्यात या औषधांचं उंदरांवर यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आल्याचं म्हटलंय. शरीरातील 'जॉम्बी' पेशी नाश पावल्यानं शरीर अधिक कार्यक्षम होतं. त्यामुळं माणसाचं आयुष्य वाढू शकतं असा त्यांचा दावा आहे.

ब्रिटनमधील संशोधकाच्या दाव्यानं विज्ञान जगतात खळबळ उडालीय. अर्थात या संशोधनाला WHO किंवा इतर मान्यवर संघटनांनी अद्याप पुष्टी दिलेली नाही. मात्र डॉ. अँड्र्यू  स्टील यांनी खरंच असं औषध शोधलं असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील ही मोठी क्रांतीच म्हणावी लागेल.