Fact Check : आता हवेतून येणार ऑनलाईन फूड डिलिव्हरी?

व्हीडिओ पाहून लोक हैराण झालेयत. अचानक हवेत उडणारं विमान कसं काय आलं हाच प्रश्न लोकांना पडला.   

Updated: Nov 15, 2022, 11:21 PM IST
Fact Check : आता हवेतून येणार ऑनलाईन फूड डिलिव्हरी? title=

Viral Video : तुम्ही ऑनलाईन फूड (Online Food) ऑर्डर केली तर तुम्हाला काही मिनिटातच फूड डिलीव्हरी मिळेल. तुम्ही जिथे असाल तिथे डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) हवेतून तुम्हाला फूड आणून देईल. असंच एका फूड डिलीव्हरी बॉयचा व्हीडिओ व्हायरल होतोय. हा डिलीव्हरी बॉय कशी फूड डिलीव्हरी करतो. चला पाहुयात. (fact check viral polkhol flying man delivering food in saudi arabia)

व्हीडिओ पाहून लोक हैराण झालेयत. अचानक हवेत उडणारं विमान कसं काय आलं हाच प्रश्न लोकांना पडला. यावेळी ही व्यक्ती उडत उडत थेट बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरच पोहोचली. आणि बॉक्समधून आणलेलं फूड देऊन पुन्हा निघून गेली. हा व्हीडिओ पाहून लोक कन्फ्यूज झालेयत. असं नक्की काय घडलं. हे लोकांना कळलंच नाही. आता हा व्हिडिओ नीट पाहा. 

ही व्यक्ती हवेत उडत उडत आली आणि पहिल्या मजल्यावरच पोहोचली. नीट पाहिलं त्यावेळी हा फूड डिलिव्हरी बॉय असल्याचं स्पष्ट झालं. पण, व्हिडिओ नक्की आहे कुठला? अशी हवेत उडत फूड डिलिव्हरी सुरू झालीय का? हा प्रश्न अनेकांना पडल्याने आम्हीही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा व्हीडिओ कुठला आहे? नक्की हा काय करतो याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा.

व्हायरल पोलखोल

ऑनलाईन फूड डिलीव्हरी सिस्टमचा प्रकार आहे. सौदी अरबमधील हा फूड डिलीव्हरीचा व्हिडिओ आहे. जेटपॅकच्या सहाय्याने डिलीव्हरी बॉय उंच उडतोय. हेल्मेट आणि सुरक्षेची डिलिव्हरी बॉयने काळजी घेतलीय. जेटपॅकची किंमत कोटींमध्ये आहे. सध्या सौदी अरेबियामध्ये हा प्रयोग सुरू आहे. फूड डिलीव्हरीसाठी याचा वापर केला जातोय. रोबोट, ड्रोननंतर आता जेटपॅकचा फूड डिलिव्हरीसाठी वापर होत असून, भविष्यात असं आपल्या देशात पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको.