जेफ बेजोसला मागे टाकत बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत ते...

फोर्ब्सच्या ऑगस्ट 2021 च्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी (Forbes Real Time Billionaires List)जारी करण्यात आली आहे

Updated: Aug 7, 2021, 01:01 PM IST
जेफ बेजोसला मागे टाकत बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत ते... title=

नवी दिल्ली : फोर्ब्सच्या ऑगस्ट 2021 च्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी (Forbes Real Time Billionaires List)जारी करण्यात आली आहे. या वर्षी लग्जरी फॅशन ब्रॅंड Louis Vuitton चे मालक बर्नार्ड अर्नाल्ट यांची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून वर्णी लागली आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. बर्नार्ड अर्नाल्टने(Bernard Arnault) जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉनचे मालक जेफ बेजोस, आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी मागे टाकले आहे. आतापर्यंत ऍमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत (world's Richest Man)  व्यक्ती होते.

फोर्ब्सने रिअल टाइम बिलिनेअर्सची लिस्ट जारी केली आहे. ज्यामध्ये बर्नार्ड अर्नाल्ट सर्वोच्च स्थानी आहे. फोर्ब्सच्या मते बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती 198.9 अब्ज डॉलर झाली आहे.  

Louis Vuitton शिवाय बर्नार्ड यांच्याकडे फेंडी, क्रिश्चियन डायर आणि जिवेंची सारखे ब्रॅंड आहेत. बर्नार्ड Louis Vuitton सोबतच 70 ब्रॅंड सांभाळतात.

बर्नार्ड अर्नाल्ट यांनी 1984 मध्ये लग्जरी गुड्स मार्केटमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर बर्नार्ड अर्नाल्ट यांनी एका टेक्सटाइल ग्रुपचे अधिग्रहन केले होते. या ग्रुपकडे क्रिश्चियन डायरचे स्वामित्व होते.

बर्नार्ड यांचा जन्म 5 मार्च 1949 रोजी फांन्समध्ये झाला होता. त्यांनी प्रतिष्ठित अशा इकोले पॉलिटेक्निकमधून इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले होते.